शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी स्वत:ची 'मन की बात' देशावर लादतात - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 20:24 IST

देशातील जनतेची मन की बात न ऐकता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची मन की बात देशावर लादतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.

नवी दिल्ली, दि. 02 - देशातील जनतेची मन की बात न ऐकता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची मन की बात देशावर लादतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करुन देश चालवत आहेत, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली. नवी दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात आज ते बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदीवर हा आरोप केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चा न करता ते संघाशी बोलतात. काँग्रेस आणि भाजपमध्ये हाच फरक आहे. काँग्रेसला देशातील सर्वांचा आवाज राजकारणात आणायचा आहे. मात्र भाजपला सर्वसामान्यांचा आवाज राजकारणात नको आहे,  अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे काँग्रेस व्यावसायिक लोकांचा आवाज समोर आणण्यासाठी नव्या समितीवर काम करत आहे. राहुल गांधीच्या म्हणाले व्यवसायिक लोकांना राजकारणात सामाविष्ट कराण्याचा हा एक प्रयत्न आहे. काल मंगळवारी राहुल गांधी यांनी आपला मतदार संघ अमेठी जवळील जगदीशपूरच्या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्गवर हेत असेल्या भूमी अधिग्रहणाच्या प्रकरणावर त्यांच्याशी चर्चा केली. याशिवाय लखनऊमधील 90 शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.आज दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये शशी थरुर, मिलिंद देवरा उपस्थित होते. यावेळी त्यांनी एका नव्या वेबसाईटचे लाँचिग केलं. असंघटित कामगार वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसकडून प्रोफेशन काँग्रेसची उभारणी करण्यात येणार आहे. असंघटित कर्मचाऱ्यांना राजकारणात आणण्यासाठी काँग्रेसकडून या आघाडाची निर्मिती केली जाणार आहे त्याद्वारे व्यावसाईक लोकांना काँग्रेसमध्ये जोडलं जाईल. यावेळी ते म्हणाले की, देशातील व्यवसाईक लोकांचा आवाज राजकारण्याप्रर्यंत पोहचेल.