नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनादरम्यान न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात बैठक घेण्याचा प्रस्ताव असल्याची आपणाला माहिती नाही, असे पाकचे भारतातील उच्चयुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेचे अधिवेशन याच सप्टेंबरमध्ये होणार आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. मोदी हे 26 ते 29 र्पयत न्यूयॉर्क येथे असतील, तर शरीफ हे 22 ते 27 या काळात न्यूयॉर्कमध्ये मुक्काम करतील.