शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

मोदी म्हणे, फळं सर्वांनी खा, परंतु कामाची चिंता करू नका, राहुल गांधींनी भाजपावर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:17 IST

शिमला- हिमाचल प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीसुद्धा उतरले आहेत. राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशमधल्या सिरमोर जिल्ह्यातील पांवटा साहिब रॅलीला संबोधित केलं आहे.

शिमला- हिमाचल प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीसुद्धा उतरले आहेत. राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशमधल्या सिरमोर जिल्ह्यातील पांवटा साहिब रॅलीला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर निशाणा साधला आहे.राहुल म्हणाले, गीतेत लिहिलं आहे की, कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका, परंतु मोदीजी सांगतात, फळं सर्वांनी खा परंतु कामाची चिंता करू नका. राहुल गांधींनी गीतेचा हवाला देत मोदींना लक्ष्य केलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जसजशा निवडणुका जवळ येतायत. त्याप्रमाणेच निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आता खुद्द काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. नरेंद्र मोदी कामाची चिंता करत नाहीत, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना खडे बोल सुनावले आहेत.मोदींनी हिमाचल प्रदेशातील सफरचंदाचं पीक घेणा-या, शेती करणा-या व पर्यटनासाठी काम करणा-यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. रॅलीदरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री वीरभद्र सिंगसह अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मनरेगासाठी आमच्या सरकारनं देशाला 35 हजार कोटी रुपये दिले आहेत. परंतु एवढेच पैसे मोदी सरकारनं कंपन्यांना दिले आहेत. हा कोणता विकास मॉडल आहे, असाही सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.तत्पूर्वी हिमाचल प्रदेशच्या एका रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. मोदी म्हणाले होते, हिमाचल प्रदेशची निवडणूक कोणताही पक्ष लढत नाही, तर हिमाचल प्रदेशची जनता लढतेय. काँग्रेसच्या हुकूमशाहीला धडा शिकवण्याचा निर्णय जनतेनं केला आहे. प्रचारातही मजा येत नाहीये, असंही मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस