शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

मोदी-जिनपिंग भेटीने संबंधांतील ताण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 02:00 IST

दोन देशांतील संबंध सुधारणेच्या दृष्टीने या बैठका महत्त्वाच्या असल्या तरी त्यात डोकलामचा विषय येण्याची शक्यता कमी आहे.

वुहान (चीन) : डोकलामला वादामुळे भारत-चीन यांच्यातील संबंध अद्याप तणावाचे असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वुहान शहरात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीने दोन देशांतील तणाव कमी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. शी जिनपिंग भारतात आले, तेव्हा त्यांनी मोदी यांना चीनला येण्याचे निमंत्रण दिले होते.दोन दिवसांत या दोन नेत्यांत सहा बैठका होणार आहेत. दोन देशांतील संबंध सुधारणेच्या दृष्टीने या बैठका महत्त्वाच्या असल्या तरी त्यात डोकलामचा विषय येण्याची शक्यता कमी आहे. ही भेटच अनौपचारिक आहे. अमेरिकेने चीनच्या वस्तुंच्या आयातीवरील कर वाढवल्याचे आपल्या उत्पादनांच्या निर्यातीसाठीसाठी भारताच्या बाजारपेठेकडे चीन लक्ष ठेवून आहे. त्यामुळे व्यवसाय वाढवण्यावरही या चर्चा होणे अपेक्षित आहे.आंतराष्ट्रीय व आशियातील प्रश्नांवर आज चर्चा झाल्याचे कळते. वुहानमधील हुबे म्यूझियममध्ये मोदींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याआधी साबरमतीमधील गांधीजींच्या आश्रमात मोदी व जिनपिंग यांच्यात पहिली अनौपचारिक बैठक झाली होती. त्यानंतरची ही दुसरी अनौपचारिक भेट आहे. या बैठकीत डोकलामविषयी चर्चा होणार नसेल, तर या भेटीला काहीच अर्थ नाही, अशी टीका काँग्रेसने मोदी यांच्या भेटीच्या निमित्ताने केली आहे. (वृत्तसंस्था)पूर्वतयारी होती सुरूया दोन नेत्यांच्या भेटीच्या पूर्वतयारीसाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री विजय गोखले, भारताचे चीनमधील राजदूत गौतम बंबावाले यांनी अनेक चिनी नेत्यांशी चर्चा केली होती. याच आठवड्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या चीनमध्ये परिषदेसाठी उपस्थित होत्या.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन