शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मोदी विदेशात पत्रकार परिषद घेतात, भारतात का नाही? भेदभावावरुन औवेसींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 18:57 IST

मोदींनी अमेरिकेत पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना, अल्पसंख्यांकांसोबत भारतात कुठलाही भेदभाव केला जात नसल्याचं म्हटलं

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेत तेथील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र, पंतप्रधान पदावर बसल्यापासून नरेंद्र मोदींनी देशात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, त्यावरुन त्यांच्यावर नेहमीच टीका होते. मोदींनी ९ वर्षात अनेक कार्यक्रम, सभा, रॅली, भाषणे केली. मात्र, एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यावरुन, राहुल गांधींसह इतरही विरोधकही त्यांना लक्ष्य करतात. पण, मोदींनी अमेरिकेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. त्यावरुन, आता एमआयएमचे खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी मोदींना प्रश्न विचारला आहे.

मोदींनी अमेरिकेत पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना, अल्पसंख्यांकांसोबत भारतात कुठलाही भेदभाव केला जात नसल्याचं म्हटलं. त्यावरुन, औवेसींनी मोदींना काही प्रश्न विचारले आहेत. देशात भाजपचे ३०० मंत्री आहेत, मग त्यापैकी एकही मंत्री मुस्लीम का नाही? असा थेट सवाल औवेसींनी विचारला. तसेच, ९ वर्षांत पहिल्यांच मोदींनी पत्रकार परिषद घेतली, तीही विदेशात. मोदी भारतात पत्रकार परिषद का घेत नाहीत, असा सवालही औवेसींनी विचारला.  अमेरिकेतून मोदींनी भारतात भेदभाव होत नसल्याचं म्हटलं. पण, मणीपूरमध्ये ३०० गिरीजाघरांना जाळण्यात आलं, तो भेदभाव नाही का. सीएए कायदा भेदभावाच्या आधारावर बनवण्यात आलाय. भाजपाजवळ ३०० मंत्री असून त्यापैकी एकही मुस्लीम नाही, हा भेदभाव नाही का? असा सवाल औवेसींनी विचारला आहे.  

अल्पसंख्यांकांच्या भेदभावावरुन मोदींना प्रश्न

भारतातील अल्पसंख्याक समुदायाबद्दल अमेरिकेतील पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला होता. लोक म्हणतात.. भारतातील अल्पसंख्यांक समुदायासोबत भेदभाव केला जातो, असं ह्युमन राईट्स आणि लोकांचं म्हणणं आहे? असा प्रश्न विचाारण्यात आला. त्यावर, मोदींनी उत्तर दिलं होतं. भारत हा लोकशाहीप्रधान देश असल्याचं म्हटलं. मला आश्चर्य होतंय की तुम्ही म्हणता लोकं म्हणतात.. लोकं म्हणतात... पण भारत लोकशाहीप्रधान देश आहे. जसं की राष्ट्रपती जो बायडन यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिका दोन्ही देशांचा डीएनए लोकशाही आहे, लोकशाही आमच्या रक्तात आहे, लोकशाही आम्ही जगतो, आमच्या पूर्वजांनी संविधानच्या रुपाने ते शब्दबद्ध केलं आहे, असे मोदींनी म्हटले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीInternationalआंतरराष्ट्रीयMuslimमुस्लीम