अलिगढ : उत्तर प्रदेशातील सपा आणि काँग्रेसच्या आघाडीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी खिल्ली उडविली. सध्या भाजपाचे वादळ असून त्याला तोंड देण्यासाठी अखिलेश यादव हे कुणालाही पकडून ठेवत आहेत. अगदी खांबालाही घट्ट धरून ठेवत आहेत, अशी टीका त्यांनी केली. येथे एका रॅलीमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, समुद्र खवळलेला असतो तेव्हा त्यात कोणीच टिकू शकत नाही. त्यामुळे अशा वेळी व्यक्ती आधार शोधत असतात.
सपा-काँग्रेस आघाडीची मोदींनी उडविली खिल्ली
By admin | Updated: February 6, 2017 00:53 IST