शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मोदींनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्तच केली! मित्र, सहका-यांनी बँंका लुटल्या : राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:55 PM

पीएनबीचा ११,४०० कोटींचा घोटाळा व त्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीचे देशातून पलायन यावरून थेट तोफ डागताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची वित्तीय व्यवस्था उद््ध्वस्त केल्याचा आरोप शनिवारी केला.

नवी दिल्ली : पीएनबीचा ११,४०० कोटींचा घोटाळा व त्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीचे देशातून पलायन यावरून थेट तोफ डागताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची वित्तीय व्यवस्था उद््ध्वस्त केल्याचा आरोप शनिवारी केला.काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मोदी यांनी त्यांच्या कृतींनी देशाची वित्तीय व्यवस्था बरबाद केली आहे. त्यांनी लोकांच्या खिशातून पैसे काढून घेऊन ते बँकांमध्ये घातले. आता त्यांचेमित्र व सहकारी ते पैसे बँकांमधून लुटून नेत आहेत.सुकाणू समितीची बैठकराहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करून नियुक्त केलेल्या सुकाणू समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत ५ मार्चपूर्वी पक्षाचे अधिवेशन घेण्याबाबत चर्चा झाली. राहुल गांधी यांची पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाली असली तरी त्यावर शिक्कामोर्तब काँग्रेसच्या अधिवेशनात होईल. सुकाणू समितीच्या आजच्या बैठकीस यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, गुलाब नबी आझाद, ए. के. अँथनी, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आदी नेते उपस्थित होते.पक्षाची नवीन कार्यकारिणी अधिवेशनात निवडली जाईल. राहुल गांधी यांनी सध्याची कार्यकारिणी रद्द करताना ३५ सदस्यांची सुकाणू समिती नेमली. कार्यकारिणीचे सर्व सदस्य सुकाणू समितीचेही सदस्य असले तरी त्यातून अमरिंदर सिंग, विलास मुत्तेमवार, आर. के. धवन, शिवाजीराव देशमुख, मोहसिना किडवाई, एम.व्ही. राजशेखरन या कायम निमंत्रितांना तसेच सर्व विशेष निमंत्रितांना वगळले आहे.सुकाणू समितीचे इतर सदस्यबी. के. हरिप्रसाद, डॉ. सी. पी. जोशी, दिग्विजय सिंग, हेमो पूर्वो सैकिया, जनार्दन द्विवेदी, कमल नाथ, मोहन प्रकाश, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, सुशीला तिरिया, अशोक गेहलोत, के. सी. वेणुगोपाळ, अविनाश पांडे, सुशीलकुमार शिंदे, दीपक बाबरिया, पी. सी. चाको, आशा कुमारी, डॉ. ए. चेल्ला कुमार, आर.पी.एन. सिंग, पी. एल. पुनिया, आर. सी. खुंटाई, डॉ. कर्णसिंग, पी. चिदम्बरम, आॅस्कर फर्नांडिस, आनंद शर्मा व रणदीप सूरजेवाला.रोखठोक उत्तरे द्याया घोटाळयाचे खापर काँग्रेस व संपुआ सरकारच्या माथी मारून भाजपा मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करीत आहे, असे सांगून राहुल गांधी असेही म्हणाले की, अत्यंत वरच्या पातळीवरून संरक्षण असल्याखेरीज एवढा मोठा घोटाळा होऊच शकला नसता. सरकारमधील मंडळींना पूर्वकल्पना असल्याखेरीज हे घडू शकत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी मुख्य विषयाला बगल न देता आम्ही विचारलेल्या प्रश्नांना रोखठोक उत्तरे द्यावीत, असेही ते म्हणाले.भाजपाचा पलटवारपंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा यूपीए सरकारच्या काळातीलअसून, त्यांनी केलेली पापे धुवून काढण्याचे काम आम्हाला करावे लागत आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, नीरव मोदी याच्या एका कंपनीशी काँग्रैसचे नेते अभिषेक सिंघवी यांच्या पत्नी अनिता यांचा संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला.अब्रुनुकसानीचादावा करूनिर्मला सीतारामन यांच्या आरोपांचा अभिषेक सिंघवी यांनी लगेच स्पष्ट शब्दांत इन्कार केला. माझी पत्नी वा कुटुंबातील कोणाचाही गीतांजली ज्वेलर्सची काडीमात्र संबंध नाही, असे सांगतानाच सिंघवी यांनी खोट्या माहितीबद्दल आपण निर्मला सीताराम यांच्यावर अब्रनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशाराही दिला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी