शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

मोदींवरही सरबत्ती? नोटाबंदीची माहिती हवी : संसदीय समितीसमोर बोलावणार?

By admin | Updated: January 10, 2017 05:17 IST

नोटाबंदीबाबत संसदेच्या लोकलेखा समितीला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल, केंद्रीय वित्त सचिव अशोक लवासा व शक्तिकांत दास यांच्याकडून समाधानकारक उत्तरे

सुरेश भटेवरा /नवी दिल्लीनोटाबंदीबाबत संसदेच्या लोकलेखा समितीला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल, केंद्रीय वित्त सचिव अशोक लवासा व शक्तिकांत दास यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही खुलाशासाठी लोकलेखा समितीच्या सरबत्तीला सामोरे जावे लागेल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष खा. के.व्ही. थॉमस यांनी दिली.थॉमस म्हणाले, नोटाबंदीनंतर आपण पंतप्रधानांची भेट घेतली होती. ५0 दिवसांनंतर स्थिती सामान्य होईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. प्रत्यक्षात असे घडल्याचे दिसलेले नाही. नोटाबंदीचा निर्णय योग्य होता, हे पटवून देण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान भ्रम निर्माण करीत आहेत, असेही ते म्हणाले.लोकलेखा समितीने नोटाबंदीचा निर्णय व त्यानंतर उद्भवलेल्या स्थिती-संदर्भात अर्थ मंत्रालयाचे उच्चपदस्थ अधिकारी व रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना प्रश्नावली पाठवली आहे. ती अशी आहे.अद्याप उत्तरे मिळाली नाहीत... समितीने पाठविलेल्या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. ही उत्तरे २0 जानेवारीपूर्वी वा २0 जानेवारीच्या बैठकीत ऊर्जित पटेल, अशोक लवासा आणि शक्तिकांत दास यांच्याकडून मिळतील, अशी अपेक्षा आहे. त्यांची उत्तरे समाधानकारक न वाटल्यास समिती मोदींनाही बोलावण्याचा विचार करेल, असे थॉमस म्हणाले. कॅगच्या अहवालांवर विचारविनिमय करण्याचा अधिकार राज्यघटनेने ज्या लोकलेखा समितीला दिला आहे, ती समिती लोकहितासाठी कोणालाही समितीपुढे बोलावू शकते. अर्थात सर्वसंमतीनेच पंतप्रधानांना समितीपुढे बोलावण्याचा निर्णय होेईल.प्रश्नच प्रश्न...8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय कशा प्रकारे घेतला? निर्णय प्रक्रियेत कोण सहभागी होते? रद्द झालेल्या जुन्या नोटांद्वारे किती रक्कम बँकांत जमा झाली? रिझर्व्ह बँकेतर्फे अर्थव्यवस्थेत पुन्हा किती रक्कम टाकली गेली आहे? नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशांची समस्या दूर झाली काय? आपलेच पैसे बँकेतून काढण्यास लोकांना रोखणारा कोणता कायदा?अर्थव्यवस्था व गरीब जनतेवर या निर्णयाचा कोणता परिणाम झाला?