शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार पुन्हा घालणार आरबीआयच्या तिजोरीत हात? ३० हजार कोटी मागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 12:44 IST

महसूल वाढत नसल्यानं सरकारनं आरबीआयकडे मोर्चा वळवण्याच्या तयारीत

नवी दिल्ली: मोदी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंतरिम लाभांश मागण्याची शक्यता आहे. सरकार आरबीआयकडून ३० हजार कोटींचा लाभांश मागू शकतं. २०१९-२० मधील वित्तीय तूट एकूण जीडीपीच्या ३.३ टक्के ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र सध्याचं सरकारचं उत्पन्न पाहता वित्तीय तुटीचं लक्ष्य गाठणं अवघड दिसत आहे. त्यामुळे सरकार आरबीआयकडे लाभांश मागू शकतं, असं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलं आहे. कॉर्पोरेट करात कपात करण्यात आल्यानं सरकारच्या महसुलावर परिणाम होणार आहे. याशिवाय जीडीपी वाढीची टक्केवारी ५ टक्क्यांपर्यंत खाली घसरली आहे. गेल्या ६ वर्षांमधील हा निच्चांक आहे. जीडीपीचा आकडा वर नेण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळेच सरकार आरबीआयच्या तिजोरीत हात घालू शकतं. 'सरकार गरज पडल्यास आरबीआयकडे अंतरिम लाभांश मागू शकतं. हा लाभांश २५ ते ३० हजार कोटींचा असू शकेल,' अशी माहिती एका अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. जानेवारीच्या सुरुवातीला सरकार आरबीआयकडून लाभांश मागू शकतं, असंदेखील या अधिकाऱ्यानं सांगितलं. वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी आणखी काही मार्ग अवलंबण्याचा सरकारचा विचार आहे. निर्गुंतवणूक आणि नॅशनल स्मॉल सेव्हिंग्स फंडच्या (एनएसएसएफ) माध्यमातून वित्तीय तूट कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न आहेत. याआधीही सरकारनं वित्तीय तूट कमी करण्यासाठी आरबीआयकडून अंतरिम लाभांश मागितला होता. गेल्या आर्थिक वर्षात सरकारनं आरबीआयकडून २८ हजार कोटींचा लाभांश घेतला होता. तर २०१७-१८ मध्ये आरबीआयनं सरकारला १० हजार कोटींचा लाभांश मिळाला होता.   

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदी