नवी दिल्ली : मोदी सरकारची धोरणे कुचकामी आहेत. विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि कॉर्पोरेट उद्योगांना करांमध्ये मोठी सवलत देणारी या सरकारची धोरणे कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत, असे माकपा महासचिव सीताराम येचुरी म्हणाले.सोमवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत येचुरी बोलत होते. विदेशी गुंतवणूक आकर्षित केल्याने आणि कॉर्पोरेट कंपन्यांना करांमध्ये मोठी सवलत देणारी मोदी सरकारची धोरणे कुचकामी आहेत. कारण यामुळे उत्पादन क्षमता निर्माण होऊ शकत नाही. लोकांकडे क्रयशक्ती उरलेली नसल्यामुळे ही धोरणे कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत, असे येचुरी यावेळी म्हणाले.मोठ्या गुंतवणुकीने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे दावे सरकार करीत आहे. मात्र यात काहीही तथ्य नाही. असा दावा येचुरी यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्र्क)
‘मोदी सरकारची धोरणे कुचकामी’
By admin | Updated: May 4, 2015 22:55 IST