शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण व्यक्ती केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:04 IST

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण हे व्यक्ती केंद्रीत आणि दिशाहीन असल्याची टीका काँग्रेसने येथे महाधिवेशनात केली आहे. सरकार मोठ्या देशांसोबतचे संबंध चांगले ठेऊ शकले नाही.

नवी दिल्ली : मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण हे व्यक्ती केंद्रीत आणि दिशाहीन असल्याची टीका काँग्रेसने येथे महाधिवेशनात केली आहे. सरकार मोठ्या देशांसोबतचे संबंध चांगले ठेऊ शकले नाही. पाकिस्तान, चीनसारख्या देशांच्या आव्हानांना तोंड देण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोपही करण्यात आला.महाधिवेशनात परराष्ट्र धोरणावर सादर प्रस्तावात पं. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या काळातील परराष्ट्र धोरणाची स्तुती करण्यात आली. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले की, देशाचे परराष्ट्र धोरण राष्ट्रीय सहमतीसह मजबूत राहिलेले आहे. मात्र, भाजपामुळे राष्ट्रीय सहमतीच भंग पावली आहे.काँग्रेसने म्हटले की, परराष्ट्र धोरणाबाबत सद्या भ्रम निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत सद्या जगात संक्रमणाचा काळ आहे. आमच्या परराष्ट्र धोरणापुढेही अनेक आव्हाने आहेत. शेजारी देशांकडून अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधानांचे विदेश दौरे फक्त दोन देशांतील व्यवहारापुरतेच मर्यादित राहिले आहेत.पाकिस्तानबाबत अधिक प्रभावी आणि आक्रमक धोरणाचा दावा खोटा आहे. याचे कोणतेही सकारात्मक परिणाम मिळाले नाहीत. यूपीएच्या काळात भारत- पाकिस्तानातील तणाव कमी झाला होता. आनंद शर्मा यांनी म्हटले आहे की, परराष्ट्र धोरण ‘इव्हेंट मॅनेजमेंट आणि फोटो आॅपर्च्युनिटी’ असू शकत नाही. यासाठी गांभीर्य असायला हवे.

टॅग्स :congressकाँग्रेस