नवी दिल्लीः चीनमधल्या वुहानमधून पसरलेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाऱ्यासारखा पसरतो आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थाही संकटात सापडली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकांना दिलासा देण्यावर काम सुरू असून लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केलं आहे. 30 जूनपर्यंत प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. उशिरा कर परतावा भरणाऱ्यांकडून 12ऐवजी 9 टक्के दंड आकारला जाणार आहे. कर परताव्यास उशीर झाल्यास दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे.
नोकरदारांना मोदी सरकारचा दिलासा; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 17:01 IST
उशिरा कर परतावा भरणाऱ्यांकडून 12ऐवजी 9 टक्के दंड आकारला जाणार आहे.
नोकरदारांना मोदी सरकारचा दिलासा; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
ठळक मुद्देचीनमधल्या वुहानमधून पसरलेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाऱ्यासारखा पसरतो आहे. भारतीय अर्थव्यवस्थाही संकटात सापडली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकांना दिलासा देण्यावर काम सुरू असून लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केलं आहे.