शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गरीबांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता 30 सप्टेंबरपर्यंत घेता येणार 'या' योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 19:40 IST

PM Garib Kalyan Ann Yojana : अशा बैठका साधारणपणे बुधवारी होतात. मात्र शनिवारी ही बैठक कोणत्या उद्देशाने बोलावण्यात आली, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. दुपारी साडेचार वाजता ही बैठक बोलावण्यात आली होती. अशा बैठका साधारणपणे बुधवारी होतात. मात्र शनिवारी ही बैठक कोणत्या उद्देशाने बोलावण्यात आली, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीत घेण्यात आला असा निर्णय - या मंत्रिमंडळ बैठकीत पीएम गरीब कल्याण अन्न योजनेला (PM Garib Kalyan Ann Yojana) पुढील ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील, असा निर्णय मोदी मंत्रिमंडळात घेण्यात आला. ही योजना ३१ मार्चला संपणार होती.

सरकारनं कोरोना काळात सुरू केली होती ही योजना - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने ही योजना (PMGKAY) सुरू केली होती. यासाठी मोदी सरकारने १.७० कोटींची तरतूद केली होती. या अन्न योजनेंतर्गत गरिबांना प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत धान्य मिळत आले आहे. 

३१ मार्चपासून काँग्रेसचं 'महागाईमुक्त भारत अभियान' -देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावरून काँग्रेस ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान 'महागाई मुक्त भारत अभियान' सुरू करणार आहे. या मोहिमेची सुरुवात तीन टप्प्यात धरणे आंदोलनानं केली जाणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मोदी सरकारने लोकांना महत्व न देता आपली तिजोरी भरण्याचा उद्योग सुरू केला आहे. 

महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतींविरोधातील आंदोलनात राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही सहभागी होणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. सुरजेवाला म्हणाले, इंधनाच्या सततच्या लुटीमुळे सर्वसामान्यांचे खिसे रिकामे होत आहेत. पण सरकारला याची पर्वा नाही. पाच दिवसांत आज चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यावरून आज काँग्रेसने भाजप सरकारवर हल्ला चढवला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान