शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने जिंकला विश्वास; मतदानालाही उपस्थित नव्हती इंडिया आघाडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 06:20 IST

अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सडेतोड उत्तर; मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवेल, दिली ग्वाही

सुनील चावकेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नजीकच्या भविष्यात शांततेचा सूर्य मणिपूरमध्ये निश्चितपणे उगवेल. हा देश, हे सभागृह मणिपूरच्या माताभगिनींच्या सोबत आहे. ईशान्य भारत आमच्या हृदयाचा तुकडा आहे. आम्ही सारे मिळून मणिपूरच्या आव्हानावर तोडगा काढून तिथे पुन्हा शांतता प्रस्थापित होईल. ते राज्य पुन्हा विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करेल. त्यात कुठलीही कसर राहणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात दिली. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर अविश्वास ठरावावर आवाजी मतदान झाले. त्यात तो प्रस्ताव फेटाळला गेला आणि मोदी सरकारच्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाले. 

मोहब्बत नव्हे नफरत की दुकाननरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या ‘मोहब्बत की दुकान’चाही समाचार घेतला. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून अपय़शी ठरलेल्या उत्पादनाला वारंवार लाँच करतात. मोहब्बत की दुकान असा प्रचार केला जातो पण जनता म्हणते, ही लूट की दुकान, झूठ का बाजार त्यात द्वेष, घोटाळे, तुष्टीकरण, मन काळे आहे. तुमच्या दुकानाने आणीबाणी, फाळणी, शिखांवरील अत्याचार, इतिहास विकला आहे. नफरत दुकानवाल्यांनो शरम करा, तुम्ही सैन्याचा स्वाभिमान विकला.

जाणून घ्या कोणत्या विषयावर काय बोलले

मणिपूर : विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांनी दिलेल्या मणिपूरच्या चर्चेच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली असती तर एकट्या मणिपूरच्या प्रत्येक पैलूवर, विस्तारावर चर्चा होऊ शकली असती. पण, त्यांना चर्चेत स्वारस्य नव्हते. गृहमंत्र्यांनी २ तास विस्ताराने जनतेला जागरूक करण्याचा आणि मणिपूरच्या जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न केला. मणिपूरवर न्यायालयाचा निकाल आल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. अनेक कुटुंबांना आपले आप्त गमवावे लागले. महिलांसोबत गंभीर, अक्षम्य गुन्हे घडले. दोषींना केंद्र आणि राज्य सरकार कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, या सभागृहात भारत मातेविषयी जे काही बोलले गेले त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या भावनेला ठेच लागली आहे.

इंडिया आघाडी : विरोधकांच्या २६ पक्षांच्या ‘घमंडिया’ आघाडीच्या नव्या दुकानावरही काही दिवसांनी कुलूप लागणार आहे. ही आघाडी भारताच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे काढण्याची हमी आहे. ते कधीही भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत स्थान मिळवून देण्याची हमी देऊ शकत नाही. 

भारतमाता : सत्तेच्या सुखाशिवाय जगू न शकणारे काही लोक भारतमातेच्या मृत्यूची कामना करताना दिसत आहे. यापेक्षा काही दुर्दैव असू शकत नाही. हे तेच लोक आहेत जे लोकशाही आणि संविधानाच्या मृत्यूच्या गोष्टी करतात. जे मनात असते तेच त्यांच्या कृतीतून पुढे येते.

पंतप्रधानांच्या भाषणावेळी विरोधकांचा सभात्यागकाँग्रेसचे अधीररंजन चौधरी निलंबित- अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केल्याबद्दल काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निलंबित केले. 

मतदान झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आल्याची घोषणा लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला यांनी केली.

आगामी लोकसभा : पुढच्या वर्षी भाजप-रालोआ २०२४ साली जुने सर्व विक्रम मोडीत काढून सत्तेत परतेल.अविश्वास प्रस्ताव : हा प्रस्ताव म्हणजे विरोधकांचीच शक्तिपरीक्षा आहे. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभच ठरतो. भाजप-रालोआ २०२४ साली जुने सर्व विक्रम मोडीत काढून भव्य विजयासह सत्तेत परतेल हे तुम्ही ठरवूनच टाकले आहे. गरिबी अन् तरुण : विरोधकांना त्यांचे पक्ष देशापेक्षा मोठे वाटतात. त्यांना देशातील गरिबांच्या भुकेची चिंता नाही तर सत्तेची भूक डोक्यावर स्वार आहे. त्यांना देशातील तरुणांपेक्षा आपल्या राजकीय भविष्याची चिंता आहे, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदNo Confidence motionअविश्वास ठरावMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन