शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

मोदी सरकारचा मोठा निर्णय! 1.5 कोटी कामगारांना थेट लाभ, हाती जास्त पैसे येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 6:59 PM

Minimum Wages Revised for workers: महागाई भत्त्यातील वाढ ही CPI-IW च्या सरासरीनुसार करण्यात आली आहे. यासाठी जुलै 2020 ते डिसेंबर 2020 चे आकडेवारी गृहीत धरण्यात आली आहे. याचा फायदा रस्ते बांधकाम, वास्तू बांधकाम, साफ सफाई, चौकीदार, कृषी आणि खाण क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना होणार आहे.  

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने (Labour ministry) मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांत आणि पीएसयुमध्ये काम करणाऱ्या जवळपास 1.5 कोटी कामगारांच्या महागाई भत्त्यात (dearness allowance) वाढ केली आहे. यामुळे त्यांच्या कमीतकमी वेतनात वाढ होणार आहे. (Rate of Minimum Wages Revised has been revised for Central sphere workers, said minister Santosh gangwar.)

श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की, सरकारने केंद्र सरकार, रेल्वे, खाणी, पेट्रोलियम क्षेत्र, मुख्य बंदरे आणि केंद्र सरकारच्या कोणत्याही मंडळामध्ये (PSU) काम करणाऱ्या कामगाराच्या व्हेरिएबल महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे. यानुसार, महागाई भत्त्यात आता 105 रुपये प्रति महिना असलेला भत्ता वाढून आता 210 रुपये करण्यात आला आहे. याचा जवळपास 1.5 कोटी कामगारांना दैनिक मजुरीमध्ये थेट लाभ मिळणार आहे. 

1 एपिलपासून लागू होणारमंत्रालयाने घेतलेल्या या महागाई भत्त्यात वाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे. यासंबंधांत 21 मे रोजी आदेश जारी करण्यात आले आहे. गंगवार यांनी ट्विटरवर व्हिडीओ जारी करून याची माहिती दिली आहे. याचा लाभ कंत्राटावर काम करणाऱ्या कामगारांनाही मिळणार असल्याचे ते म्हणाले. 

महागाई भत्त्यातील वाढ ही CPI-IW च्या सरासरीनुसार करण्यात आली आहे. यासाठी जुलै 2020 ते डिसेंबर 2020 चे आकडेवारी गृहीत धरण्यात आली आहे. याचा फायदा रस्ते बांधकाम, वास्तू बांधकाम, साफ सफाई, चौकीदार, कृषी आणि खाण क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना होणार आहे.  

मुख्य आयुक्त लागू करणारही भत्ता वाढ कामगार मंत्रालयाचे मुख्य आयुक्त लागू करणार आहेत. त्यांच्या अंतर्गत काम करणारे निरिक्षण अधिकारी हा आदेश देशभरात लागू करणार आहेत.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीInflationमहागाईIndian Railwayभारतीय रेल्वे