शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

LPG Subsidy: केवळ 'त्या' कुटुंबानाच मिळणार LPG सबसिडी?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 07:57 IST

LPG Subsidy: मोदी सरकारकडून अंतर्गत मूल्यांकन; कोट्यवधी नागरिकांना झळ बसण्याची शक्यता

नवी दिल्ली: घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या अनुदानाबद्दल (LPG Subsidy) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एलपीजी सिलिंडरसाठी (LPG Cylinder) ग्राहकांना १ हजार रुपये मोजावे लागू शकतात, असे संकेत सरकारनं केलेल्या अंतर्गत मूल्यांकनामधून मिळत आहेत. मात्र सरकार याबद्दल नेमका काय विचार करतंय, त्याबद्दलची स्पष्ट आणि ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही.

न्यूज१८ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, सरकारनं सिलिंडरवरील अनुदानाबद्दल बऱ्याचदा चर्चा केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही योजना तयार झालेली नाही. सरकारकडे सध्या २ पर्याय आहेत. कोणत्याही अनुदानाशिवाय सिलिंडरचा पुरवठा हा पहिला पर्याय असून काही ग्राहकांना अनुदानाचा लाभ देणं हा दुसरा पर्याय आहे.

सरकारची योजना काय?अनुदानाबद्दल सरकारनं अद्याप तरी स्पष्ट काहीच सांगितलेलं नाही. सध्या लागू असलेला १० लाख उत्पन्नाचा नियम तसाच राहू शकतो. याशिवाय उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळू शकतो. इतरांना मिळणारं अनुदान सरकार थांबवू शकतं. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबासाठी उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबाना एलपीजी कनेक्शन देण्यात आली. सध्या देशात २९ कोटींहून अधिक जणांकडे एलपीजी कनेक्शन आहे. त्यातील उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या ८.८ कोटी इतकी आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये आणखी १ कोटी कनेक्शन देण्याचा सरकारचा मानस आहे.

सध्या अनुदानाची स्थिती काय?२०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं जगभरातील अनेक देशांत लॉकडाऊन सुरू होता. त्यावेळी खनिज तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे मोदी सरकारला एलपीजी अनुदानाच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला. त्यावेळी एलपीजीच्या किमती कमी झाल्या. त्यामुळे अनुदानासंदर्भात बदल करण्याची आवश्यकता नव्हती. मे २०२० पासून अनेक क्षेत्रांत एलपीजी अनुदान बंद झालं.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर