शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमधील 'या' मंत्र्यांना आणीबाणीच्या काळात भोगावा लागला तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 13:43 IST

 देशाचे विद्यमान  रक्षामंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथसिंह यांच्याकडे आणीबाणीच्या काळात भाजपची मिर्जापूर जिल्ह्याची जवाबदारी देण्यात आली होती.

नवी दिल्ली - देशात लागू करण्यात आलेल्या  आणीबाणीच्या घटनेला ४४ वर्षेपूर्ण झाली आहेत. या ४४ वर्षांच्या  काळात आज देशात राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या  अनेक बदल झाले आहे. आणीबाणीच्या काळात ज्या युवा नेत्यांनी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आणीबाणीला विरोध केला होता,त्या नेत्यांना त्याचा मोबदला म्हणून आज सत्तेत जागा मिळाली मिळाली आहे. विशेष म्हणजे या नेत्यांनी  रस्तावर उतरून आणीबाणीच्या काळात सरकार विरोधात आंदोलने केली होती , त्यामुळे त्यांना तुरुंगवास सुद्धा  भोगावा लागला होता.

 देशाचे विद्यमान  रक्षामंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथसिंह यांच्याकडे आणीबाणीच्या काळात भाजपची मिर्जापूर जिल्ह्याची जवाबदारी देण्यात आली होती. या काळात त्यांनी आणीबाणीला प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे त्यांना १८ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला होता. तर याचवेळी आताचे कायदे व माहिती तंत्रज्ञान मंत्री असलेले रविशंकर प्रसाद यांना सुद्धा तुरुंगात जावे लागले  होते. त्यावेळी ते पटना विद्यापीठात अखिल भारतीय  विद्यार्थी परिषद  संघटनेचे कार्यकर्ते होते.

आत्ताच्या मोदी सरकारमध्ये असलेले सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री थावरचंद गेहलोत हे आणीबाणीच्या काळात आरएसएस संघटनेत कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्याकडे नगदा जंक्शन येथील संघटनेची मुख्य संयोजक पदाची जवाबदारी देण्यात आली होती. आणीबाणीच्या काळात विरोध केला म्हणून तत्कालीन सरकारने गेहलोत यांना १० महिने तुरुंगात ठेवले होते.

या बरोबरच, विद्यमान कामगार मंत्री संतोष गंगवार ह्यांना सुद्धा आणीबाणीला विरोध केला म्हणून तुरुंगात जावे लागले होते. तसेच, लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि ग्राहक व्यवहार व अन्न, सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांना सुद्धा त्यावेळी १८ महिने कारागृहात काढावे लागले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री अश्विनी चौबे यांना सुद्धा सरकारने जेलमध्ये टाकले होते . तर कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी ५ महिने तुरुंगात काढले होते. या वेतिरिक्त केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना सुद्धा आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला होता.