शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वात मोठं स्वयंपाकघर झालं GST मुक्त; केंद्र सरकारची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 15:48 IST

तब्बल 55 ते 60 हजार लोक दररोज याठिकाणी जेवतात.

नवी दिल्ली: धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या अन्नछत्रांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून अमृतसर येथील सुवर्ण मंदिरासह विविध शीख संघटनांनी गुरुद्वारातील लंगरसाठी लागणाऱ्या गोष्टींना जीएसटीच्या कक्षेतून वगळण्याची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 2018-19 ते 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 325 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली. सेवा भोज योजनेतंर्गत ही आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. त्यानुसार अन्नछत्र चालवणाऱ्या धार्मिक व स्वयंसेवी संस्थांना त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंवरील जीएसटीची (CGST+ IGST) रक्कम परत केली जाईल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सुवर्ण मंदिराच्या प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सुवर्ण मंदिरातील लंगर हा जगातील सर्वात मोठा मुदपाकखाना मानला जातो. याठिकाणी दररोज तासाला 25 हजार पोळ्या बनवल्या जातात. तब्बल 55 ते 60 हजार लोक दररोज याठिकाणी जेवतात. यासाठी मंदिर प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर गव्हाचे पीठ, तूप, डाळी, भाज्या, साखर, तांदूळ आणि अन्य जिन्नसाची व्यवस्था करावी लागते. इतक्या मोठ्याप्रमाणावर खरेदी होत असल्याने त्यावर जीएसटीही जास्त लागतो. त्यामुळेच अनेक शीख संघटनांनी सुवर्ण मंदिरातील लंगरला जीएसटीच्या कक्षेतून वगळण्याची विनंती केली होती. 

टॅग्स :GSTजीएसटीfoodअन्न