शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने भरवले नोकरशाहीला कापरे

By admin | Updated: February 17, 2017 00:55 IST

नोकरशाहीला मोदी सरकारने कापरे भरेल असा संदेश दिला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) आणि भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) तीन अधिकाऱ्यांना

हरीश गुप्ता / नवी दिल्ली नोकरशाहीला मोदी सरकारने कापरे भरेल असा संदेश दिला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) आणि भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) तीन अधिकाऱ्यांना ‘अकार्यक्षमतेबद्दल’ हाकलल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (एनएचएआय) अध्यक्ष राघव चंद्र यांना नुकतीच मध्यरात्री आदेश देऊन अत्यंत कमी महत्त्वाची जबाबदारी दिली गेली आहे. ज्या तडकाफडकी राघव चंद्र यांना काढून टाकण्यात आले त्याचा धक्का तर रस्ते वाहतूक आणि जहाज खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनादेखील बसला. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हकालपट्टीला स्वत: राघव चंद्रच जबाबदार आहेत. मोदी यांनी एनएचएआयच्या प्रकल्पांचा आढावा घेणारी बैठक बोलावली होती. मोदी प्रकल्पांचा आढावा संबंधित खात्याच्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत एकेका प्रमुखाला बोलावून घेतात. मोदी यांनी १०,१६६ कोटी रुपयांच्या १४ पदरी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेच्या प्रगतीबद्दल राघव चंद्र यांना विचारले असता त्यांनी हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात असलेल्या अडचणी सांगितल्या. डिसेंबर २०१५ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते झाली होती. या प्रकल्पामुळे दिल्लीतील प्रचंड वाहतूक कोंडी दूर व्हायला मदतच झाली असती असे नाही तर जाटांचे प्राबल्य असलेल्या भागातील भाजपची महत्वाची मतपेटी व व्यापारी वर्गाला आपलेसे करण्यात मदत झाली असती. एकूण ३४८.६ हेक्टर्स जमीन तीन पॅकेजेससाठी आवश्यक असून मोदी यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली, तेव्हाच ३४३.३६ हेक्टर्स जमिनीचे संपादनही झाले होते. राघवचंद्र यांनी एक पाऊल पुढे टाकून उत्तर प्रदेशात एनएचएआय इतर महत्वाचे प्रकल्प कसे पूर्ण करीत आहे, हे मोदी यांना सांगायला सुरुवात केली आणि राघव चंद्र यांचे भवितव्य निश्चित झाले. सूत्रांनी सांगितले की मोदी यांचा संयम सुटत चालला होता. मोदी राघवचंद्र यांना म्हणाले,‘‘मधुमेह झालेल्याला तुम्ही द्राक्षाचा रस दिल्यावर तो जिवंत राहील? मधुमेहीला कारल्याच्या रसाची गरज असते.’’ ही बैठक मग एकाएकी संपली.ही बैठक संपली तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते आणि राघव चंद्र यांच्या बदलीचा आदेश सरकारच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) दुसऱ्याच दिवशी सकाळी धडकला.नितीन गडकरी यांना हा आणखी एक झटका होता. कारण त्यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत एनएचएआयचे तीन अध्यक्ष बघितले. राघव चंद्र यांना अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे सचिव हे तुलनेने कमी महत्वाचे पद देण्यात आले आहे. निती आयोगात विशेष सचिवपदी असलेले युद्धवीर सिंह मलिक यांना आता राघवचंद्र यांची जबाबदारी दिली गेली आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे (एफएसएसएआय) अध्यक्ष असताना मलिक यांनी नेसलेच्या उत्पादनांवर बंदी घातली होती व त्यामुळे ते एकदम चर्चेत आले होते. ही बंदी न्यायालयांनी काढून टाकली आणि मलिक यांना वर्षभरापूर्वी निती आयोगात हलवण्यात आले. राघव चंद्र यांना दूर करण्यात आल्याची आणि त्यांच्या जागी मलिक येत असल्याची काहीही माहिती गडकरी यांना नव्हती.