शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेला गती

By admin | Updated: June 14, 2016 04:31 IST

दोन वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून, निर्णय प्रक्रिया मजबूत झाली आहे, असे सांगत भाजपाने सोमवारी आपल्या कामगिरीचा

अलाहाबाद : दोन वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून, निर्णय प्रक्रिया मजबूत झाली आहे, असे सांगत भाजपाने सोमवारी आपल्या कामगिरीचा लेखाजेखा मांडला. सरकारने एकात्मिक आर्थिक दृष्टिकोन अवलंबला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेची ७.९ टक्के वाढ झाली आहे, तसेच कृषी विकासही नकारात्मक स्थितीतून बाहेर येत आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले. त्यांनी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, ‘कृषी विकास आता २.४ टक्के आहे. पूर्वी तो ०.२ टक्के होता. परिस्थिती नकारात्मक होती. या पूर्वीच्या संपुआ सरकारच्या काळात ३.५ कोटी बँक खाती होती, पंतप्रधानांनी जन धन योजना सुरू केल्यानंतर खातेधारकांची संख्या वाढून २१.८० कोटी झाली असून, यातील अनेक जण डेबिट कार्ड व दुर्घटना विमा यांसारख्या सुविधांचा लाभही घेत आहेत.’ बळीराजाच्या उन्नतीप्रती सरकारची बांधिलकी दर्शविताना ते म्हणाले की, ‘पुढील चार वर्षांत प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात ५० हजार कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.’ युरिया मिळविण्यासाठी या पूर्वी भांडणे होत. मात्र, आता युरियाचे २५ लाख टन एवढे विक्रमी उत्पादन करण्यात आले असून, तो सहजरीत्या मिळतो. निम कोटेड युरियाबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘यामुळे युरियाचा इतर उद्देशांसाठी काळाबाजार होणार नाही.’ ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘देशात कोळशाचे अतिरिक्त उत्पादन झाले असून, त्यामुळे औष्णिक ऊर्जेची निर्मिती वाढली. भ्रष्टाचारमुक्त निर्णयामुळे आता देशात धोरण लकव्यासारखी स्थिती उरली नाही. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोनदिवसीय बैठकीचा आज अखेरचा दिवस आहे.’ चंद्रशेखर आझादांना पुष्पांजलीभाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी येथे आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथील चंद्रशेखर आझाद पार्कला भेट देऊन महान क्रांतिकारकाच्या स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. आठ दशकांपूर्वी याच पार्कमध्ये आझाद यांनी इंग्रजांशी लढताना अखेरचा श्वास घेतला होता. पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. पंतप्रधानांना हात हलवून त्यांना अभिवादन केले. बैठकीकडे जाताना पंतप्रधानांचा ताफा चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये थांबला.त्रिवेणी संगमावर नेत्यांचे स्नानभाजपा नेत्यांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याची संधी साधली. केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि पक्षाचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी आज संगमावर स्नान केले. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांनी रविवारी संगमावर स्नान केले होते. तथापि, झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे आनंद भवन पाहण्यासाठी गेले असता, तेथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध केला. आनंद भवन हे नेहरू-गांधी कुटुंबाचे वाडवडिलोपार्जित घर आहे. (वृत्तसंस्था)भाजपाचा आलेख उंचावतोय : गडकरीभाजपाचा आलेख उंचावत असून, आमच्याच पक्षाला भवितव्य आहे. याउलट काँग्रेस पक्ष मात्र नामशेष होत चालला आहे, असे प्रतिपादन भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे केले. केरळसारख्या दक्षिण भारतातील राज्यात वा आसाम व पश्चिम बंगालसारख्या पूर्व उत्तर भारतासारख्या राज्यांत भाजपाचे आतापर्यंत फारसे अस्तित्व नव्हते, पण आता भाजपा संपूर्ण देशभर वाढत चालला असून, ज्या ठिकाणी काँग्रेस मोठी होती, तिथे ती आता नावालाच शिल्लक राहिली आहे. दक्षिण आणि पूर्व भारतातील राज्यांत येत्या काळात भाजपाच प्रमुख पक्ष बनलेला पाहायला मिळेल.उत्तर प्रदेशात भाजपाचा मुख्यमंत्री या पदाचा उमेदवार कोण असेल, या प्रश्नाचे सरळ उत्तर देण्याचे गडकरी यांनी टाळले. पक्षाध्यक्षांनी त्याबाबत निर्णय घ्यायचा असतो आणि तो त्यांचा अधिकार आहे. -नितीन गडकरी