शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Elections 2018 : मोदी-गांधी यांच्यात रंगले वाक्युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:19 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी येथील प्रचार रंगात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राज्यात जोरदार सभा सुरू आहेत.

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी येथील प्रचार रंगात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राज्यात जोरदार सभा सुरू आहेत. गुरुवारी दोन्ही नेत्यांनी शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले.मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारचे वर्णन ‘सिद्ध रूपया सरकार’ असे केले. मोदी म्हणाले की, तुमचा उत्साह व जोश आता काँग्रेसचे कर्नाटकातील सरकार जाणार हे सिद्ध करीत आहे. सिद्धरामय्यांनी राज्याला कर्जबाजारी करून टाकले त्यामुळे लोक आता त्यांना सहन करणार नाहीत.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला प्रगती पुस्तकावर शेतीच्या विषयात ‘फ’ वर्ग दिला. शेतकऱ्यांना काँग्रेसच्या राज्य सरकारने ८,५०० कोटींची कर्ज माफी दिली परंतु केंद्राचे त्यात काहीही योगदान नाही, असे गांधी टिष्ट्वटरवर म्हणाले. मोदी हे माझ्यावर कशीही टीका करू शकतात परंतु मी वैयक्तिक शेरेबाजी करणार नाही, असे गांधी म्हणाले. प्रचारसभेत गांधी म्हणाले की, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना (राफेल विमान खरेदी, फरार नीरव मोदी) मोदी उत्तरे देत नाहीत तर फक्त माझ्यावर वैयक्तीक हल्ले करतात. मोदी प्रचारात म्हणाले होते की राहुल गांधी यांनी माझ्याबद्दल काहीही खरे-खोटे बोलावे त्यामुळे मला काही फरक पडत नाही.वोक्कालिगांच्या मतांचे ध्रुवीकरण?बंगळुरू : जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) नेते एच. डी. देवेगौडा यांची पंतप्रधान मोदी यांनी अनपेक्षितपणे प्रशंसा केल्याने कर्नाटकात जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती ही की, काँग्रेसला मिळणारी वोक्कालिगांची मते यामुळे दूर जाऊ शकतात. देवेगौडा यांची मोदीस्तुती ही भाजपा-जनता दल (एस) मैत्री असल्याचे बोलले जात आहे.‘देवेगौडांचा अनादर केलेला नाही’बंगळुरू : एच. डी. देवेगौडा यांच्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कधी आदर व्यक्त केला नाही हा मोदी यांचा दावा निराधार आहे. वास्तविक मोदी यांनीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व गौडा यांचा सन्मान राखला नाही. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे मत काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी गुरुवारी मांडले. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८