शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींना कूटनीती समजत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 03:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कूटनीतीची अजिबात समज नाही.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कूटनीतीची अजिबात समज नाही. ते कूटनीतीचाही इव्हेंट मॅनेजमेंटप्रमाणेच विचार करीत असून त्यामुळेच गुरुदासपूर, पठाणकोट आणि पांपोरसारख्या दहशतवादी घटना घडत आहेत, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. पक्षाचे नेते कपिल सिब्बल यांनी सरकारी आकडेवारी सादर करताना सांगितले की, ५० जहाल नक्षलवादी पाकिस्तानातून भारतात घुसले असताना सरकार मात्र निद्रिस्थ आहे. एकीकडे सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्यासोबत इफ्तारी साजरी करीत आहेत. पाकिस्तानबद्दल मोदी सरकारचे काय धोरण आहे तेच कळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तान दौरा व नवाज शरीफ यांच्या मैत्रीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी सरकार पाकिस्तानसह ज्या पद्धतीने नाते जपत आहे आणि वेळोवेळी भारताकडून पुढाकारानंतरही हल्ल्यांची जी मालिका सुरू आहे त्यातून धडा घेण्याची गरज आहे. परंतु सरकारची तशी इच्छा दिसत नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला. गृहमंत्री राजनाथसिंग व परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तानबाबत वक्तव्यांचा समाचार घेताना केवळ बयाणबाजीच होत राहणार का? कारवाई केव्हा होणार? असा सवाल सिब्बल यांनी केला. भारतीय जवान कुठवर शहीद होणार याचे उत्तर पंतप्रधानांना द्यावे लागेल, असे आव्हान त्यांनी दिले. मोदींची फिरकी घेताना ते म्हणाले, हा साऊंड व लाईट शो नाही. परराष्ट्र धोरण गंभीरपणे राबवावे लागते. मोदी यांना कूटनीतीचा कुठलाही अनुभव नसल्याने ते कूटनीतीचा केवळ देखावा करीत असतात, असे काँग्रेसचे मत आहे. अणु पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यतेबाबतही मोदींची वागणूक अशीच राहिली. जगभरात ढोल पिटला आणि सेऊलमधून रिक्त हस्ते परत आले. एनएसजीवर मुत्सद्देगिरीत भारताच्या अपयशामुळे देशाची प्रतिमा मलिन झाली असून याला पूर्णत: पंतप्रधान मोदी यांचे चुकीचे धोरण जबाबदार आहे, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.