शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी यांनी संविधानाचा अवमान केल्याची वकील महिलेची तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 11:27 IST

संविधानात कुठेही देशाच्या नावाचा उल्लेख हिंदुस्तान असा येत नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी दिल्लीत लाल किल्ल्यावरून केलेल्या ५५ मिनिटांच्या भाषणात अनेकदा भारताचा उल्लेख हिंदुस्तान असा केला. त्यामुळे भारतवासियांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप करीत एका वकील महिलेने सिडको पोलीस ठाण्यात पंतप्रधान मोदी यांच्या विरूद्ध तक्रार दिली आहे. 

औरंगाबाद, दि. 16 -  संविधानात कुठेही देशाच्या नावाचा उल्लेख  हिंदुस्तान असा  येत नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी दिल्लीत लाल किल्ल्यावरून केलेल्या ५५ मिनिटांच्या भाषणात अनेकदा भारताचा उल्लेख हिंदुस्तान असा केला. त्यामुळे भारतवासियांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप करीत एका वकील महिलेने सिडको पोलीस ठाण्यात पंतप्रधान मोदी यांच्या विरूद्ध तक्रार दिली आहे. औरंगाबादेतील अ‍ॅड. रमा विठ्ठलराव काळे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, संविधानाच्या कलम एक नुसार देशाचे नाव भारत म्हणजेच इंडिया असे आहे.  मोदींनी १२५ कोटी लोकांना संबोधित करताना देशाचा उल्लेख हिंदुस्तान म्हणून करणे हा भारतीय संविधानाचा अपमान आहे.   पंतप्रधान मोदींचे भाषण देशातील १२५ कोटी जनतेने ऐकले. याशिवाय जगभरातील अनेकांनीही मोदींचे भाषण ऐकले. कोट्यवधी लोकांसमोर बोलताना, देशाला संबोधित करताना भारताचा उल्लेख हिंदुस्तान असा करणे अपमानास्पद आहे. त्यामुळे देशावर प्रेम असणाऱ्या जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा दावा काळे यांनी त्यांच्या तक्रारीत केला. पंतप्रधान म्हणून मोदी यांचे हे  बेजबाबदार विधान आहे. हे संविधानाचे कलम १ चे उल्लंघन आहे. त्यामुळे पंतप्रधानाविरूद्ध देशद्रोह तथा इतर योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशभर घेतलेल्या जाहिर सभामधून देशाबाहेर गेलेले काळेधन आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५लाख रुपये जमा करील , असे अमिश दाखविले व जनतेची फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.  या तक्रारीची प्रत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविली आहे.