शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

लष्कराचे आधुनिकीकरण योग्य दिशेने सुरू; अपुऱ्या निधीचं वृत्त तथ्यहीन -लष्करप्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 9:44 AM

वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत जनरल नरवणे यांनी म्हटले आहे की, लष्कराचे आधुनिकीकरण योग्य पद्धतीने, दिशेने सुरूच आहे व यासाठी संसाधन सरकार पुरवीत आहे.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण योग्य दिशेने सुरू आहे, लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिली. पूर्व लडाखमध्ये चीनसमवेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) अधिक संसाधन खर्च करण्याची गरज असून, यातून नवी शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी पैशाची चणचण आहे, अशी चर्चा त्यांनी फेटाळून लावली. मागील वित्त वर्षात आतापर्यंत २१ हजार कोटी रुपयांच्या कंत्राटांची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच ढांचागत विकासासाठी अन्य खरेदी प्रस्ताव प्रक्रियेमध्ये आहेत.वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत जनरल नरवणे यांनी म्हटले आहे की, लष्कराचे आधुनिकीकरण योग्य पद्धतीने, दिशेने सुरूच आहे व यासाठी संसाधन सरकार पुरवीत आहे. काही दिवसांपूर्वीच १६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कंत्राट पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर पाच हजार कोटी रुपयांचे ४४ कंत्राटे वित्त वर्ष २०२०-२१मध्ये आपात खरेदी योजनेसाठी पूर्ण केले आहेत. लष्कराच्या आधुनिकीकरणात कसल्याही अडचणी नाहीत.सरकारने फेब्रुवारी २०२१-२२साठीच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी ४.७८ लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यातील १.३५,०६० कोटी रुपयांची तरतूद पूंजीगत व्ययसाठी वेगळी करण्यात आली होती. यात नवी शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने, युद्धजहाज व अन्य लष्करी साहित्याची खरेदी समाविष्ट आहे. अर्थसंकल्पानुसार वित्तवर्ष २०२१-२२ साठी संरक्षण क्षेत्राच्या पूंजीगत व्ययमध्ये मागील वर्षीच्या १,३१,७३४ कोटी रुपयांच्या तुलनेत १८.७५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.चीनच्या वाढत्या आक्रमकतेला प्रभावी पद्धतीने तोंड देण्यासाठी संरक्षण तज्ज्ञ मागील काही वर्षांपासून भारतीय लष्कराचे वेगाने आधुनिकीकरण करण्यावर भर देत आहे. पूर्व लडाखमध्ये मागील वर्षी मे महिन्यात ४५ वर्षांत प्रथमच भारतीय सेना व चिनी सेनेमध्ये हिंसाचार होऊन तणाव वाढलेला आहे. पेंगाँग सरोवराजवळ सैनिकांच्या वापसीच्या मुद्द्यावर मर्यादित प्रगती झाली आहे, तर उर्वरित ठिकाणी असाच प्रकारची पावले उचलण्यासाठीच्या चर्चेत अडथळे आले आहेत.जनरल नरवणे यांनी सांगितले की, सध्या भारतीय लष्कर उंचीवरील ठिकाणांच्या सर्व महत्त्वाच्या स्थानी पकड ठेवून आहे. तेथे कोणत्याही आपात स्थितीशी निपटण्यासाठी पुरेशा संख्येने आरक्षित जवान अस्तित्वात आहेत.राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या पूर्व लडाखमध्ये एलएसीच्या संवेदनशील भागांत सध्या ५० हजार ते ६० हजार सैनिक तैनात आहेत.भारत व चीनच्या संबंधांत गलवान खोऱ्यातील हिंसाचारानंतर तणाव वाढला आहे.दोन्ही देशांनी या भागात हजारोंच्या संख्येने सैनिक व रणगाडे, शस्त्रास्त्रे तैनात केलेली आहेत.तणाव कमी करण्यासाठी नऊ महिन्यांनंतर सैन्य व राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.त्यानंतर दोन्ही देशांच्या सेना पेंगाँग सरोवराच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यावरून मागे हटली आहेत. सैन्य वापसीसाठी दोन्ही बाजूंच्या चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्या आहेत. तरीही इतर ठिकाणांबाबत तणाव कायम आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानmanoj naravaneमनोज नरवणे