शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक महाभारत : जुगारात गमावली पत्नी, दोन मुले, पंचायतीनेही सांगितले एक तरी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:09 IST

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर शहरातील मोहसिन नावाच्या एका इसमाने जुगारात पत्नी आणि दोन मुले पणाला लावली आणि तिघांनाही गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर शहरातील मोहसिन नावाच्या एका इसमाने जुगारात पत्नी आणि दोन मुले पणाला लावली आणि तिघांनाही गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौरवांशी द्युत खेळताना सर्व राज्य हरल्यावर पांडवांनी पत्नी पांचाली हिचीही बाजी लावल्याने घडलेले महाभारत सर्वश्रुत आहे. तिथे पांचालीने तक्रार केली नव्हती आणि ती करायला, तेव्हा न्यायालयेही नव्हती. बुलंदशहरमधील हे आधुनिक महाभारत मात्र मोहसिनच्या पत्नीने तेथील न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात फिर्याद दाखलकेल्यावर तब्बल दोन वर्षांनी उघड झाले.पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांनी काही केले नाही, म्हणून पत्नीने ही फिर्याद दाखल केली. त्यावर दंडाधिकाºयांनी आरोपींवर गुन्हे नोंदविण्याचा आदेश दिला असून, पोलीस आता फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या महिलेने जुगारी मोहसिनला घटस्फोट देऊन चंदोरा गावातील एका तरुणाशी विवाह केला आहे.  या महिलेने फिर्यादीत दिलेली माहिती संतापजनक आहे. सन २०१२ मध्ये तिचे मोहसिनशी लग्न झाले व दोन वर्षांत दोन मुले झाली. सन २०१५ मध्ये इमरान नावाच्या इसमासोबत जुगार खेळताना, मोहसिनने पत्नी व दोन्ही मुलांची बाजी लावली व तो त्यात हरला.त्यानंतर, इमरान मोहसिनच्या घरी आला आणि त्याच्या जुगारात ‘जिंकलेल्या’ पत्नीला बळजबरीने सोबत नेऊ लागला. तिने आरडाओरडा करून विरोध केल्यावर गावाची पंचायत बसली व निदान एका मुलाला तरी इमरानकडे सोपवावेच लागेल, असा फैसला पंचांनी दिला. त्यानुसार, मोहसिनच्या एका मुलाला इमरान घेऊन गेला.