शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाच्या व्यक्तींचे मोबाइल्स आता हॅकर्सचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 05:53 IST

पाकिस्तान, चीन गुप्तचर यंत्रणा सक्रिय : पैसाही पुरवला जातोय

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : मुंबईत वीजपुरवठा खंडित झाला, त्यामागे सायबर हल्ल्याची शक्यता नाकारण्यात आली. परंतु, आता सीमेपलीकडून नव्या स्वरुपात सायबर हल्ल्याच्या सूचनेमुळे गुप्तचर संस्थांत खळबळ निर्माण झाली आहे. 

गुप्तचर सूत्रांनुसार चीन आणि पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा हॅकर्सच्या मदतीने सरकारमधील प्रमुख व्यक्तींचे फोन हॅक करण्याच्या प्रयत्नांत आहेत. सायबर सुरक्षेशी संबंधित यंत्रणांना सावध राहण्याचा आदेश दिला गेला. तसेच विशिष्ट व्यक्तींनाही सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी याआधी सरकारी किंवा खासगी संस्थांची व्यवस्था हॅकर्स लक्ष्य करायचे. आता प्रथमच देशात महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींच्या मोबाइल फोनद्वारे माहिती मिळत आहे. सूत्रांनुसार हे हॅकिंग व्हाॅट्सॲपद्वारे करण्याची योजना आहे. हॅकर्सनी यावेळी यासाठी विशेष प्रकारचा कोड तयार केला आहे. त्यावरून व्हिडिओ फाइलच्या माध्यमातून फोनमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे हॅकर्स मोबाइल फोनचे महत्त्वाचे नियंत्रण मिळवू शकतात. त्यानंतर अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्यक्रमापासून  त्याचे ठिकाण, महत्त्वाचा दस्तावेज एवढेच काय फोनचा कॅमेरा आणि माइक हॅक करून विशेष प्रसंगांचा, व्हिडिओ,  ऑडियो मिळवला जाऊ शकतो.

आयएसआयकडून पैसागुप्तचर संस्थांना हॅकर्सच्या अनेक ग्रुप्सला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून निधी मिळत असल्याची माहिती मिळाली आहे. या हॅकर्सना अनेक प्रकारच्या सुविधाही दिल्या जात आहेत. त्यात चीनच्या संस्थाही सहभागी आहेत.

या हल्ल्यांतून सुरक्षित राहण्यासाठी मोबाइल सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीमला अपडेट ठेवणे, मोबाइलमध्ये अँटिव्हायरस असणे, पासवर्ड ठरावीक अंतरांनी बदलण्याचाही सल्ला तज्ज्ञांनी  दिला आहे. अनोळखी व विदेशी क्रमांकावरून येणाऱ्या व्हाॅट्सॲप कॉलकडे दुर्लक्ष करावे. व्हिडिओ डाऊनलोड करू नये व कोणत्याही लिंकवर क्लिक करताना सावधगिरी बाळगावी.

टॅग्स :Mobileमोबाइल