शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

व्यभिचार सिद्ध करण्यासाठी मोबाइल रेकॉर्ड मागता येतो, गोपनीयतेपेक्षा न्याय महत्त्वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:42 IST

व्यभिचाराच्या कारणास्तव दाखल घटस्फोटाच्या खटल्यात सीडीआर, आर्थिक नोंदी मागणे गोपनीयतेचा भंग नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: व्यभिचाराच्या कारणास्तव दाखल घटस्फोटाच्या खटल्यात सीडीआर, आर्थिक नोंदी मागणे गोपनीयतेचा भंग नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. स्मिता श्रीवास्तव व सुमित वर्मा यांचा विवाह १० ऑक्टोबर २००२ रोजी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. पतीवर व्यभिचार व क्रूरतेचे आरोप करत स्मिताने घटस्फोटाची याचिका दाखल केली. सुमितबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून संबंधित महिलेला याचिकेत प्रतिवादी म्हणून सामील केले.

दुर्लक्षित करता येणार नाहीउच्च न्यायालयाने म्हटले की, हा आदेश निरर्थक तपासाचा नाही तर तो थेट खटल्याच्या युक्तिवादांशी संबंधित आहे. न्यायालयाने असेही स्पष्ट केले की वैयक्तिक गोपनीयता आणि माहितीची गोपनीयता दुर्लक्षित करता येणार नाही.

पत्नीच्या मागण्या मान्यस्मिताने पती व तिचे सीडीआर व लोकेशन नोंदी मागवण्याचे आदेश द्यावेत, तसेच काही आर्थिक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश द्यावेत, असा अर्ज कोर्टाला केला व कुटुंब न्यायालयाने तो मंजूर केला. याला हायकोर्टात ४ याचिका दाखल करून आव्हान देण्यात आले. संबंधित महिलेने गोपनीयतेचे उल्लंघन होत असल्याचे सांगून आपले नाव व टॉवर डाटा आदेशाविरोधात अपील केले. पतीने आर्थिक नोंदी दाखवण्यास आक्षेप घेतला असता स्मिताने हॉटेल बुकिंग, अन्य कागदपत्रांची मागणी केली.

हायकोर्टाचा निर्णय१) व्यभिचाराच्या आरोपावर निर्णय घेण्यासाठी कथित परपुरुष/स्त्री १ यांची एकत्र उपस्थिती पडताळणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित महिलेचे नाव वगळण्यास नकार योग्य ठरतो, असे न्यायमूर्ती न्या. अनिल क्षेत्रपाल व न्या. हरीश विद्यानाथन शंकर यांनी म्हटले.२) सीडीआर व लोकेशन माहिती ही गोपनीयतेशी संबंधित असली तरी २ आरोपांच्या अनुषंगाने ती आवश्यक व प्रमाणबद्ध आहे.३) हॉटेल बुकिंग प्रवास तसेच पतीच्या 3 बँक, गुंतवणूक नोंदीतून पत्नीचा मुद्दा सिद्ध होऊ शकतो. ते देणे योग्य आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालय