शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Helicopter crash : सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघातापूर्वीचा व्हिडीओ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे, प्रत्यक्षदर्शींचीही पोलिसांकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 22:03 IST

Helicopter crash : धुक्यात हेलिकॉप्टर गायब झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून जिल्हा पोलिसांनी जोएचा मोबाईल फोन कोईम्बतूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे.

कुन्नूर: तामिळनाडूमधील (Tamil Nadu) कुन्नूरजवळ सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वीचा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला होता.

लग्न समारंभांचे फोटो आणि व्हिडिओ काढणारा कोईम्बतूरचा रहिवासी जोए, हा 8 डिसेंबर रोजी डोंगराळ निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी भागात आपला मित्र नाझर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो काढण्यासाठी गेला होता. विशेष बाब म्हणजे, अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी त्याने हेलिकॉप्टरचा व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केला होता. 

धुक्यात हेलिकॉप्टर गायब झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून जिल्हा पोलिसांनी जोएचा मोबाईल फोन कोईम्बतूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे.

पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शींचीही चौकशीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोटोग्राफर आणि इतर काहीजण घनदाट जंगलात का गेले होते, जे वन्य प्राण्यांच्या हालचालीमुळे प्रतिबंधित क्षेत्र आहे, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, पोलीस विभागाने चेन्नई हवामान विभागाकडून अपघाताच्या दिवशीचे तापमान आणि हवामानाशी संबंधित माहिती मागवली आहे. या अपघाताबाबत पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करत आहेत.

वरुण सिंग यांची प्रकृती अजूनही गंभीर कुन्नूरच्या कटेरी-नंजप्पनचत्रम भागात गेल्या बुधवारी एमआय-17 व्हीएच हेलिकॉप्टर कोसळून सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचा मृत्यू झाला. तर या अपघातातून बचावलेले भारतीय हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर बंगळुरूमध्ये उपचार सुरू आहेत. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. 

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाBipin Rawatबिपीन रावत