पुरुलिया : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील चिरुडीह गावात चार्जवर ठेवण्यात आलेल्या मोबाइलचा स्फोट होऊन त्यात एका सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. कुटुंबातील एका सदस्याने आपला मोबाइल चार्जिंगसाठी ठेवला होता. इयत्ता पहिलीत शिकणारा हा मुलगा या फोनजवळ आला आणि काही क्षणांतच फोनचा स्फोट झाला. या स्फोटामुळे निघालेल्या आगीत मुलाचे शरीर भाजले. त्यात त्याचा मृत्यू झाला. स्फोट झालेला मोबाइल फोन चिनी बनावटीचा असल्याचे तपासात आढळले आहे. (वृत्तसंस्था)
मोबाइलचा स्फोट, मुलाचा मृत्यू
By admin | Updated: March 31, 2015 04:28 IST