शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये ठाकोर समुदायाच्या मुलींना मोबाइल बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 05:37 IST

अविवाहित मुली व महिलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालणारा फतवा गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील ठाकोर समुदायाने जारी केला आहे.

पालनपूर : अविवाहित मुली व महिलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालणारा फतवा गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील ठाकोर समुदायाने जारी केला आहे. एवढेच नाही, तर आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना दीड ते दोन लाख रुपयांचा दंड करण्याचे फर्मानही सोडले आहे.या जिल्ह्यातील दांतीवाडा तालुक्यातल्या १२ गावांतल्या ठाकोर समुदायातील ज्येष्ठ सदस्यांच्या १४ जुलैला झालेल्या बैठकीत एकमताने हे निर्णय घेण्यात आले. या अन्यायकारक निर्णयांचे वाव तालुक्यातील काँग्रेसच्या आमदार गनिबेन ठाकोर यांनी उघड समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले की, अविवाहित मुलींनी मोबाइल फोन वापरण्यावर घातलेली बंदी अजिबात चुकीची नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गोष्टींपासून या मुलींनी लांबच राहिले पाहिजे व आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे.ठाकोरांच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या एका आदेशात म्हटले आहे की, या समुदायातील अविवाहित मुली मोबाइल फोन वापरताना पकडल्या गेल्या, तर त्यासाठी त्यांच्या पालकांना जबाबदार धरण्यात येईल. महाविद्यालयीन शिक्षण घेणाºया मुलींना मोबाइल देऊ नका. त्यामुळे मोबाइलच्या नादी लागून त्या वेळ वाया घालविणार नाहीत. त्याऐवजी या मुली अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करतील. ठाकोर समुदायातील जी मुले-मुली आंतरजातीय विवाह करतील, त्यांच्या पालकांना दीड ते दोन लाख रुपये दंड ठोठावण्यात येईल.दांतीवाडा येथील ठाकोरांचे एक नेते सुरेश ठाकोर यांनी सांगितले की, महाविद्यालयीन युवक-युवती मोबाइलवर नानाप्रकारचे व्हिडीओ तयार करत असतात. मोबाइल वापरण्यास बंदी केल्यानंतर या युवक-युवतींना लॅपटॉप, टॅबलेट देण्याचा ठाकोरांचा विचार आहे. या साधनांचा उपयोग हे विद्यार्थी अभ्यासासाठी करतील.>लग्नामध्ये डीजे,फटाके वाजविण्यास मनाईत्यातून वाचलेला पैसा या समुदायातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केला जाणार आहे. या निर्णयांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. काँग्रेसचे आणखी एक आमदार अल्पेश ठाकोर यांनाही या निर्णयामध्ये काहीही वावगे वाटत नाही.>ठाकोर समुदायात होणाºया लग्नांवर होणारा अव्वाच्या सव्वा खर्चात कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. लग्नामध्ये डीजे आणणे, फटाके वाजविणे, पैशाची उधळपट्टी करत वरात काढणे या गोष्टींवर ठाकोरांनी बंदी घातली आहे.