शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

मनसेच्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

By admin | Updated: May 18, 2014 00:19 IST

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरास आजपासून प्रारंभ झाला़

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरास आजपासून प्रारंभ झाला़ परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे निवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवाजीराव काळोगे व आमदार वसंत गिते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन झाले़ हे शिबिर ५ जूनपर्यंत चालणार आहे़ शिबिरासाठी एक हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ रविवारपासून सकाळी ६ ते ८ दरम्यान केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर शारीरिक प्रशिक्षण सराव होणार आहे़ दुपारी २ ते ५ या कालावधीत जुना आग्रा रोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात लेखी परीक्षांचा सराव तसेच मार्गदर्शन होणार आहे़ शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस भरतीप्रक्रिया, शारीरिक चाचण्या, त्यासाठीची तयारी, लेखी परीक्षा, विषयांचा अभ्यास यांसह विविध प्रकारची माहिती उपस्थितांनी विद्यार्थ्यांना दिली़ यामध्ये शिवाजीराव काळोगे यांच्यासह तालुका क्रीडाधिकारी पल्लवी सानप, मविप्रचे परिष्ठ क्रीडाधिकारी हेमंत पाटील, कैलास लवांड, राम खैरनार, युनिव्हर्सल फाउंडेशनचे संचालक डॉ़ जी़ आऱ पाटील, पद्माकर घुमरे आदिंनी मार्गदर्शन केले़ याप्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, मनपा गटनेता अशोक सातभाई, बाळासाहेब दुगजे, मुकेश शहाणे, सचिन चव्हाण, देवेंद्र वाटाणे, मयूर इघे, धनंजय कर्के, प्रदीप बोराडे, बबन बोडके आदि उपस्थित होते़ फ ोटो क्रमांक - 17 पीएचएपी116 फ ोटो ओळी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार वसंत गिते़