शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातही मनरेगा घोटाळा; एक लाखाहून अधिक प्रकरणे उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 06:36 IST

बनावट जॉब कार्ड असल्यास कारवाई

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मनरेगा घोटाळा उघडकीस आला असून, बनावट जॉब कार्डद्वारे पैसे गोळा करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे.

पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मनरेगाच्या नावाखाली बनावट जॉब कार्ड वापरून पैसे घेणारे लोक लवकरच सापळ्यात अडकणार आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, जॉबकार्ड आधारशी लिंक करण्याचा मोठा घोटाळा देशभरात उघडकीस आला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये २५ लाखांहून अधिक बनावट जॉब कार्डची प्रकरणे समोर आली आहेत, परंतु महाराष्ट्रही यापासून दूर राहिलेला नाही. महाराष्ट्रात आतापर्यंत बनावट एक लाखाहून अधिक बनावट जॉबकार्डचा शोध लागला आहे. त्या बनावट जॉबकार्डद्वारे मनरेगाच्या पैशांची लूट करणारा हा घोटाळा उघडकीस आला आहे. आता या सर्वांचा तपास करण्यात येत आहे. त्यात काय समोर येते ते पाहावे लागेल. 

दिवसाचा पगार किती?२०१९-२० मध्ये प्रत्येक मजूराला दिवसभराच्या कामाचे वेतन १९८ रुपये देण्यात येत होते. २०२०-२१ मध्ये हे वेतन २२४ रुपये करण्यात आले. २०२१-२२ मध्ये वेतनात आणखी वाढ करून ते २३५ रुपये करण्यात आले. २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षात मनरेगातील मजूरांना अनुक्रमे २४२ रुपये आणि २५८ रुपये वेतन देण्यात आले आहे. 

बंगाल एकटे नाही, देशातील अनेक राज्ये मनरेगातील लुटीच्या प्रकरणांची चौकशी करत आहेत. या लुटीचा पर्दाफाश झाला आहे. जॉब कार्ड आधार कार्डशी लिंक करून एकाच व्यक्तीने अनेक जॉबकार्ड बनवून घेतल्याचे तसेच अनेक जॉबकार्डचा आधार क्रमांक सुद्धा एकच असल्याचे बँक खात्यांवरून उघड झाले आहे. पश्चिम बंगालमधून सुरू झालेला मनरेगा घोटाळ्याचा तपास लवकरच देशाच्या अनेक भागात पोहोचणार आहे.- गिरीराज सिंह, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री

पैसा जातो कोठे?मनरेगाच्या लुटीमुळे केंद्र सरकारने संपूर्ण पश्चिम बंगालला दिली जाणारी मनरेगाची रक्कम थांबवली आहे, या विरोधात पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी नुकतीच दिल्लीतील कृषी भवनात निदर्शने केली होती. अनेक वर्षांपासून ही लूट सुरू असून मनरेगाचा पैसा कुठे जातो आणि गरजूंना का मिळत नाही, हे कोणी पाहत नसल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजी