शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

नवख्या झेडपीएम पक्षाला पहिल्याच निवडणुकीत बहुमत; सत्ताधाऱ्यांना दिला माेठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 07:31 IST

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना धक्का; अवघ्या पाच वर्षे वयाच्या झेडपीएम पक्षाचा पराक्रम

आयझॉल : विधानसभा निवडणुकीत  मिझोराममधील सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटसाठी अनेक निकाल धक्कादायक ठरले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह ११ मंत्र्यांपैकी ९ जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुख्यमंत्री झाेरमथांगा आयझॉल पूर्व या मतदारसंघात पराभूत झाले आहेत. 

उपमुख्यमंत्री तानलुइया यांच्यासह आरोग्य आणि कुटु्ंब कल्याणमंंत्री आर. लालथंगलियाना ऊर्जामंत्री आर. लालजीरलियाना आणि कृषिमंत्री सी. लालरिनसांगा, के. लालरिनलियाना, लालरुतकिमा, लालरिनावमा, टी. जे. लालनुनत्लुआंगा, लालचंदामा राल्ते, रॉबर्ट रोमाविया रोयते दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. 

मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामादारूण पराभवानंतर मुख्यमंत्री झाेरमथांगा यांनी राज्यपाल हरीबाबू कंभंपाती यांच्याकडे राजीनामा साेपविला. तर पक्षाच्या सर्व नवनियुक्त सदस्यांची  मंगळवारी बैठक घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असे झेडपीएमतर्फे सांगण्यात आले.

३ महिला आमदार४० सदस्यांच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या केवळ ३ आहे. बहुमत मिळविणाऱ्या झेडपीएम पक्षाच्या बॅरील व्हॅनेहसांगी, लालरीनपुई आणि एमएनएफच्या प्राेव्हा चाक्मा यांचा विजय झाला. यावेळी १७४ उमेदवारांपैकी केवळ १६ उमेदवार महिला हाेत्या. मावळत्या विधानसभेत एकही महिला आमदार नव्हत्या. 

६ पक्षांना केले एकत्रलालदुहाेमा यांनी मिझाेराम पीपल्स काॅन्फरन्स, झाेरम नॅशनलिस्टिक पार्टी, झाेरम एक्साेडस मूव्हमेंट, झाेरम डिसेंट्रलायझेशन फ्रंट, झाेरम रिफाॅर्मेशन फ्रंट आणि मिझाेराम पीपल्स पार्टी या पक्षांना एकत्र आणले. २०१८मध्ये अधिकृतरीत्या झेडपीएम आघाडीची स्थापना झाली. मात्र, आयाेगाकडे नाेंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागली.

असा साकारला विजय...पक्षाने तळागाळात जाऊन प्रचार केला. स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. भाजप किंवा काॅंग्रेससाेबत आघाडी करणार नसल्याचे लालदुहाेमा यांनी स्पष्ट केले हाेते. पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू, असे त्यांनी म्हटले हाेते. राज्यातील जनतेने याच मुद्द्यांना स्वीकारत त्यांच्या पारड्यात मतांचे दान दिले. पक्षाने तळागाळात जाऊन प्रचार केला. स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. भाजप किंवा काॅंग्रेससाेबत आघाडी करणार नसल्याचे लालदुहाेमा यांनी स्पष्ट केले हाेते. 

टॅग्स :Electionनिवडणूकmizoram assembly electionमिझोराम विधानसभा निवडणूक २०२३