शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

नेता असावा तर असा! मिझोरमच्या कोरोनाग्रस्त मंत्र्यांची अनोखी सेवा; रुग्णालयात पुसली लादी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 15:46 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाची लागण झालेल्या मंत्र्यांनी रुग्णालयात सेवा केली असून रुग्णालयात लादी साफ करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. 

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान अनेक नेते मंडळींनी देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर मिझोरममधील एका मंत्र्याचा फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या मंत्र्यांनी रुग्णालयात सेवा केली असून रुग्णालयात लादी साफ करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. 

मिझोरमचे ऊर्जामंत्री आर. लालझिरलियाना (R Lalzirliana) हे कोरोना पॉझिटिव्ह असूनही रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये सेवा करत आहेत. लालझिरलियाना यांना 11 मे रोजी कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आधी ते दोघेही होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र त्यानंतर ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने लालझिरलियाना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लालझिरलियाना रुग्णालयात सेवा करत असून लादी पुसताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर कमी वेळात खूप व्हायरल झाला.

"आम्ही ज्या वॉर्डमध्ये आहोत, तो वॉर्ड खराब होता. मी साफसफाई करण्यासाठी फोन करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याला बोलावलं होतं. मात्र खूप वेळ झाला पण कोणीच आलं नाही. अशातच मी आणखी वाट पाहत बसण्यापेक्षा स्वत: साफसफाई करायला सुरुवात केली. हे स्वच्छतेचं काम करून मला सफाई कर्मचारी अथवा प्रशासनाला खालीपणा दाखवण्याचा किंवा त्यांचा अपमान करण्याचा उद्देश नाही तर हे एक सामान्य काम आहे. मी माझ्या घरी देखील साफसफाई करतो. अशीच इथेही करतो" अशी माहिती लालझिरलियाना यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. आपल्या कृतीतून त्यांनी मनं जिंकली असून त्यांचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmizoram-pcमिजोरमhospitalहॉस्पिटल