शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मिझोराममध्ये जोरदार प्रचार सुरू; दारूबंदी, घुसखोर कळीचे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 06:37 IST

मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही काही सभा घेतील.

- असिफ कुरणे

ऐझॉल : मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही काही सभा घेतील. सध्याच्या प्रचारात राज्यातील पायाभूत सुविधांच्या अवस्थेबरोबरच दारूबंदी व अन्य देशांतून बेकायदेशीरपणे आलेले नागरिक हे मुद्दे ठळकपणे दिसतात.माजी मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी दारूबंदीसाठी आक्रमकपणे आवाज उठविला आहे. तर काँग्रेस पूर्ण बंदीच्या विरोधात आहे. मिझोरममध्ये १९९७ पासून पूर्णपणे दारूबंदी होती. चर्च व स्थानिक सामाजिक संघटनांच्यापुढाकारामुळे ही बंदी लागू झाली होती. पण काँग्रेसचे मुख्यमंत्री लाल थनहवला यांच्या सरकारने २०१४ मध्ये दारूबंदी हटवल्याने जानेवारी २०१५ पासून राज्यात नियमबद्ध दारूविक्री सुरू झाली. या निर्णयामुळे चर्च व सामाजिक संघटनांमध्ये नाराजी आहे.नव्या कायद्यानुसार महिन्याला ६ बाटल्या विदेशी मद्य, तर १० बाटल्या बीअर घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दारूबंदी पूर्णपणे हटवली, असे म्हणता येत नसल्याचा काँग्रेससरकारचा दावा आहे. तर बंदी हटवल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप विरोधी मिझो नॅशनल फ्रंट, जोरम पिपल्स मुव्हमेंट यांनी केला आहे.दारूबंदी हटवल्यानंतर राज्यात ५०० पोलीस कर्मचारी, ५ हजारलोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप जोरामथंगा यांनी केला. मार्च २०१७ पर्यंत राज्यात ११ लाख लोकसंख्येपैकी ८० हजार दारू परवानाधारक होते. याआधी १९९७ मध्ये दारूबंदी लागू करूनही त्यावेळचे मुखमंत्री लाल थनहलवा यांना सत्ता गमवावी लागली होती. त्यांनीच आपल्या २०१३च्या सलग दुसºया टर्ममध्ये दारूबंदी उठवली. यामागे राज्यातील वाढती द्राक्षशेती कारणीभूत आहे. द्राक्षशेतीमुळे वाइन उद्योगवाढीस चालना मिळत असल्याचे दारुबंदीचे विरोधक दावा करतात.बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार या देशांतून होणारे बेकायदा स्थलांतर हाही मिझोरम निवडणुकीतील कळीचा मुद्दा बनला आहे. एका अहवालानुसार सध्या मिझोराममध्ये १० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरित लोक आहेत. बांग्लादेशातून आलेल्या चकमा निर्वासितांना बाहेर काढण्याची मागणी स्थानिक सामाजिक व विद्यार्थी संघटनांनी पंतप्रधानांकडे केली होती.८७ टक्के मिझोवासी प्रेस्बिटेरियन चर्चशी जोडलेले आहेत. दैनंदिन जीवन, सामाजिक, राजकीय गोष्टींवर चर्चचा प्रभाव सहजपणे दिसतो. इथे चर्च फक्त प्रवचन देण्यापुरते मर्यादित नसून राजकीय घडामोडीतही सहभागी होत असते.मिझो संस्कृतीवर घाला - राहुल गांधीऐझॉल : मिझोरामची संस्कृती, भाषा आणि इतिहास संपवून टाकायला निघालेल्या भाजपा आणि रा. स्व. संघाला मिझोरम नॅशनल फ्रंट मदतकरीत असल्याबदनदल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एझॉलयेथील मंगळवारच्या सभेत दु:ख व्यक्त केले. हे दोन्ही पक्ष आपण एकमेकांशी निवडणुकीनंतर समझोता करणार नाही, असे सांगत असले तरी त्यात तथ्य नाही, असा दावा राहुल यांनी केला.

टॅग्स :Mizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018