शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

२३० भारतीयांना न्यूझीलंडकडे नेणारी नौका समुद्रात बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:18 IST

केरळच्या कोचीजवळील मुनाम्बम बंदरातून भारतीय स्थलांतरितांना १२ जानेवारी रोजी घेऊ न निघालेली देवमाता नावाची मासेमारी नौका बेपत्ता झाली आहे.

कोची : केरळच्या कोचीजवळील मुनाम्बम बंदरातून भारतीय स्थलांतरितांना १२ जानेवारी रोजी घेऊ न निघालेली देवमाता नावाची मासेमारी नौका बेपत्ता झाली आहे. या नौकेत २३० लोक असून, त्यात १०० हून अधिक महिला व काही लहान मुलेही आहेत. ही नौका न्यूझीलंडच्या दिशेने गेली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. ते सर्व जण दिल्ली, तामिळनाडूमधील रहिवासी आहेत.दिल्लीतील एका इसमाला अटक केल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे. हे सर्वजण आॅस्ट्रेलियाला जात असावेत, असा सुरुवातीचा अंदाज होता; पण ते न्यूझीलंडच्या दिशेला जात होते, असे नंतर सांगण्यात आले. न्यूझीलंडकडून या प्रकरणाची कोणतीही माहिती मिळालेली नाही; मात्र त्या देशात निर्वासितांना आश्रय दिला जात असल्याने ते तिथे रोजगारासाठी निघाले होते, असे समजते.या स्थलांतरितांच्या ६० बॅगा व २० ओळखपत्रे पोलिसांना मुनाम्बमच्या टोल नाक्यापाशी सापडली. बॅगांमध्ये कपडे व वस्तू आहेत. सध्या ही नौका नेमकी कुठे आहे, याचा पत्ता लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी तटरक्षक दल व अन्य यंत्रणा कामाला लागल्या आहेत. न्यूझीलंडपर्यंतचा प्रवास ९ हजार समुद्री मैलाचा आहे. या प्रवासात अनेकदा समुद्र खवळलेला असतो आणि मोठ्या वादळांचाही सामना करावा लागतो. (वृत्तसंस्था)>कुटुंबियांचाशोध सुरूजे लोक नौकेतून गेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्या कुटुंबांतील काही लोक यापूर्वीही अशाच प्रकारे आॅस्ट्रेलियाला गेले होते. मात्र रोजगाराखेरीज परदेशात अवैध पद्धतीने जाण्याचे अन्य कारण दिसत नाही, असे पोलिसांनी सांगितले.देवमाता या नौकेचा मालक बेपत्ता आहे. दिल्लीत पकडण्यात आलेल्या इसमाकडून आणखी माहिती मिळवली जात आहे.मानवी तस्करीचा हा प्रकार असून, यापूर्वी किती लोकांना याप्रकारे नेले, याचाही तपास सुरू आहे.