शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

मिश्रांनी केजरीवालांच्या 400 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे केले सादर

By admin | Updated: May 8, 2017 18:59 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(ACB)ला केजरीवालांच्या 400 कोटींच्या टँकर घोटाळ्याचे पुरावे सुपूर्द केले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - केजरीवाल सरकारमध्ये मंत्रिपदावरून हटवण्यात आलेले आम आदमी पार्टीचे आमदार कपिल मिश्रा यांनी आज दिल्लीतल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(ACB)ला केजरीवालांच्या 400 कोटींच्या टँकर घोटाळ्याचे पुरावे सुपूर्द केले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीला केजरीवाल जाणूनबुजून उशीर करत असल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला आहे. एसीबीकडे पुरावे दिल्यानंतर त्यांनी केजरीवाल कशा प्रकारे चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत, हेही अधिका-यांना सांगितलं आहे. मिश्रा यांनी दावा केला आहे की, मंत्री नसतानाही याची चौकशी करून त्याचा अहवाल केजरीवालांना सुपूर्द केला होता. त्यावेळी मी टँकर घोटाळ्यात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची शिफारस केली होती. मिश्रा म्हणाले, केजरीवाल आणि त्यांच्या दोन सहका-यांशी संबंधितही टँकर घोटाळ्यातसंदर्भात पुरावे दिले आहेत. या पुराव्यांवरून शीला दीक्षित यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्ट होत आहे. एसीबी याची सखोल चौकशी करण्यासाठी मला पुन्हा बोलावणार आहे, असंही मिश्रा म्हणाले आहेत. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकारी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोपावर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचीही मागणी केली आहे. (केजरीवालांनी माझं स्वप्न भंग केलं- अण्णा)
तत्पूर्वी अण्णांनीही केजरीवालांवर नाराजी व्यक्त केली होती. केजरीवाल सरकारनं माझं स्वप्न आधीच भंग केलं आहे. या प्रकरणावर पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. टाइम्स नाऊला अण्णा म्हणाले, मी पूर्ण प्रकरणाचा अभ्यास करेन आणि मगच त्यावर विस्तारानं चर्चा करेन, आता मी जे टीव्हीवर पाहतो आहे. त्या बातम्या पाहून मला खूप दुःख होतंय, आम्ही भ्रष्टाचाराविरोधात एकत्र लढतो आहोत. मी गेल्या 40 वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो आहे. दिल्लीत जी भ्रष्टाचार विरोधात लढाई झाली त्यामुळे केजरीवाल मुख्यमंत्री बनले. मात्र आज त्यांच्यावरच असे आरोप लागत असल्यानं ही खूपच दुःखदायक घटना आहे. मी आता त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. जेव्हा कॅबिनेटमधल्या 6 मंत्र्यांपैकी तिघांनी राजीनामा दिला, तेव्हाच माझं स्वप्न भंग झालं. कॅबिनेट मंत्री येऊन बोलतो की, मी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिले. ही खूपच दुःखाची गोष्ट आहे.
 
किरण बेदी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या, एका मुख्यमंत्र्यांविरोधत एक मंत्री भ्रष्टाचाराचे आरोप लावतो आहे. आणि साक्षीदार होण्याचा दावा करतो आहे. याची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे. एकंदरीतच केजरीवालांच्या पुढच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत.