शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बँक लुटण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांच्या डोळ्यांत टाकली मिरचीपूड

By admin | Updated: May 24, 2017 17:18 IST

काश्मीरमध्ये आज बँक लुटण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना बँकेतील सुरक्षारक्षकांनी चांगलीच अद्दल घडवली

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 24 - दहशतवादी कारवाया, फुटीरतावाद्यांची कारस्थाने लष्करावर होणारी दगडफेक, स्थानिकांमधील असंतोष  यामुळे धुमसत असलेल्या काश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांनी बँका लुटण्यास सुरुवात केली आहे. मात्र आज बँक लुटण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना बँकेतील सुरक्षारक्षकांनी चांगलीच अद्दल घडवली. 
 
काश्मीरमधील शोपियाँ भागात आज दहशतवादी बँक लुटण्यासाठी आले. तेथे उपस्थित असलेल्यांना धाकात घेतल्यावर त्यांनी सुरक्षारक्षकांची शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षारक्षकांनीही प्रसंगाला धैर्याने सामोरे जात दहशतवाद्यांचा सामना केला. त्यांनी आपल्याकडील मिरचीपूड शस्त्रे खेचण्याचा प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांच्या डोळ्यात टाकली.  अचानक झालेल्या प्रतिकारामुळे दहशतवादी गांगरले.  त्यामुळे बँक लुटण्याचा त्यांचा प्रयत्नही अयशस्वी ठरला. 
 
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बँक लुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत या महिन्याच्या सुरुवातीलाच कुलगाम जिल्ह्यातील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेत दोन दहशतवाद्यांनी दरोडा टाकून 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता. तर  कुलागाम येथील एका बॅंकेच्या एटीएम कॅशव्हॅनला दहशतवाद्यांनी लक्ष्य करत  50 लाखांच्या रोकड लुटली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये  5 पोलिसांचा समावेश होता. तसेच, दोन गार्डचीही समावेश होता.