शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यांक कल्याण योजनांचा बोजवारा ! अधिकारी उदासीन : वर्षभरात एकदाच मिळतो उजाळा आशपाक पठाण/ लातूर : १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिन

By admin | Updated: December 19, 2014 00:57 IST

संयुक्त राष्ट्रानी १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत करण्यात आला़ त्यानुसार जगभर १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो़ मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, जैन व पारसी समाजाच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ योजनांची अंमलबजावणी मात्र नुसतीच कागदोपत्री दाखविण्यात येते़ योजना राबविण्यासाठी अधिकारी, कर्मचारीच उदासिन असल्याने बहुतांश योजनांचा लाभ मिळत नसल्याची खंत अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे़ पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमातून विकास साधण्याचा प्रयत्न होत असला तरी ज्या विभागाकडून या योजना राबविण्यात येतात, त्याच विभागाचे अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत, असा आरोप रजाउल्लाह खान, रियाज्

संयुक्त राष्ट्रानी १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत करण्यात आला़ त्यानुसार जगभर १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो़ मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, जैन व पारसी समाजाच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ योजनांची अंमलबजावणी मात्र नुसतीच कागदोपत्री दाखविण्यात येते़ योजना राबविण्यासाठी अधिकारी, कर्मचारीच उदासिन असल्याने बहुतांश योजनांचा लाभ मिळत नसल्याची खंत अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे़ पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमातून विकास साधण्याचा प्रयत्न होत असला तरी ज्या विभागाकडून या योजना राबविण्यात येतात, त्याच विभागाचे अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत, असा आरोप रजाउल्लाह खान, रियाज सिद्दीकी यांनी केला़ काय आहेत योजना?१५ कलमी योजनेत एकात्मिक बाल विकास सेवांशी समन्याय उपलब्धता, शालेय शिक्षणाच्या प्रवेशासंबंधी सुधारणा करणे, उर्दु शिकविण्यासाठी बृहदत्तर साधणे, मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, अल्पसंख्यांक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठान पायाभूत शैक्षणिक सुविधा, गरिबांसाठी स्वंयरोजगार व दैनिक रोजंदारी, तांत्रिक प्रशिक्षणाद्वारे, कौशल्याची दर्जा वाढ, आर्थिक कार्यक्रमांकरिता कर्जाचे पाठबळ वाढविणे, राज्य व केंद्र सेवांसाठी भरती, ग्रामीण गृहनिर्माण योजनेत समन्याय वाटा, अल्पसंख्यांक बहुल झोपडपट्यांच्या स्थितीत सुधारणा करणे, जातीय घटनांना प्रतिबंध, जातीय अपराधाकरिता खटला, जातीय दंगलींना बळी पडलेल्यांचे पुनर्वसन यांचा समावेश आहेअनुपस्थित अधिकार्‍यांना नोटिस : जिल्हाधिकारी१५ कलमी योजनेतील बहुतांश विषय हे शिक्षण विभागाशी निगडित आहेत़ त्याचबरोबर पूरक आहार, आरोग्यतपासणी, गर्भवती, स्तनदा मातांचा विकास, अंगणवाडी केंद्र आदींची अंमलबजावणी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची आहे़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस शिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी अनुपस्थित असल्याने बैठकीत फारसी चर्चा झाली नाही़ अनुपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी पोले यांनी दिले़ तसेच एक महिन्याच्या आत पुढील बैठक बोलावून सदस्यांना माहिती देण्यात येईल़ तसेच योजनांची माहिती कार्यालयाच्या वेबसाईटवरही टाकण्याचे आदेश त्यांनी नियोजन अधिकार्‍यांना केले़यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, जि़प़ सीईओ दिनकर जगदाळे, अल्पसंख्यांक समितीचे सदस्य खाजाबानू अन्सारी, मौलाना म़अली, डॉ़ प्रभुदास दुप्ते, रामचंद्र मद्दे, शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती़ संनियंत्रण समिती सदस्यांची नाराजी़़़वर्षभरात कशीतरी एखादी बैठक होते़ त्यातही अधिकारी अनुपस्थित असतात़ बैठकीत संनियंत्रण समिती सदस्य खाजाबानू अन्सारी यांनी वेळोवेळी माहिती मागितली असता संबंधित विभागाचे अधिकारीच उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली़ त्यांच्याकडे कसलाही स्टॅटीस्टीक डाटा उपलब्ध नव्हता़