निवाडा येथील घटना, गुन्हा दाखलरेणापूर : तालुक्यातील निवाडा येथील एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका मुलाने मंगळवारी बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील निवाडा येथील एका पाच वर्षीय मुलगी ही आपल्या घरासमोर खेळत होती. त्यावेळी गावातीलच शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून, तथा आपण दोघे खेळू असे म्हणत त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान पीडित मुलीच्या आईने रेणापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन त्या मुलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By admin | Updated: September 17, 2015 00:30 IST