अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत
By admin | Updated: July 12, 2015 21:35 IST
ठाणे : एका पंधरावर्षीय तरुणीचा विनयभंग करणार्या विलास कानेकर (५२), रा. वागळे इस्टेट, ठाणे याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत
ठाणे : एका पंधरावर्षीय तरुणीचा विनयभंग करणार्या विलास कानेकर (५२), रा. वागळे इस्टेट, ठाणे याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.महात्मा फुलेनगरातील धुणीभांडी करणार्या महिलेच्या १५ वर्षीय मुलीचा त्याने ९ जुलै रोजी सकाळी १० वा.च्या सुमारास रामचंद्रनगरच्या रस्त्यावर विनयभंग केला. त्यानंतर, तिला मारहाणही केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ११ जुलै रोजी दुपारी २ वा.च्या सुमारास तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एस.एस. गवते या अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)...............................प्रतिनिधी - जितेंद्र कालेकर