अश्लील संभाषणामुळे मंत्रिपद गेले
By admin | Published: March 27, 2017 01:29 AM2017-03-27T01:29:39+5:302017-03-27T01:29:39+5:30
एका महिलेशी फोनवरुन अश्लील संभाषण केल्याचा आरोप झाल्यानंतर केरळचे परिवहन मंत्री ए. के. शशिंद्रन यांनी
कोझिकोड : एका महिलेशी फोनवरुन अश्लील संभाषण केल्याचा आरोप झाल्यानंतर केरळचे परिवहन मंत्री ए. के. शशिंद्रन यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला आहे.
माकपच्या नेतृत्वातील एलडीएफ सरकारमधून आपण मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एलडीएफच्या सरकारमधील ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या आॅडिओ क्लिपमध्ये ए. के. शशिंद्रन हे मंत्री एका महिलेसोबत कथितरित्या आक्षेपार्ह भाषेत संभाषण करत असल्याचे समोर आले आहे. ही आॅडिओ टेप एका मल्याळम टीव्ही चॅनलने प्रसारित केली आहे. त्यानंतर काही तासातच शशिंद्रन यांनी पत्रकार परिषदेत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री पी. विजयन यांना आपण याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपला राजीनामा मागितलेला नाही. शशिंद्र्रन म्हणाले की, आपण आपल्या गुन्ह्याची कबुली केली आहे अशा अर्थाने या राजीनाम्याकडे बघू नये. या निर्णयातून आपण राजकीय नैतिकता कायम ठेवली आहे.
आपण कुणासोबतही गैरव्यवहार केलेला नाही आणि कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे. योग्य चौकशीची आवश्यकता आहे. वस्तुस्थिती समोर यायला हवी.