शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 20:23 IST

Rammohan Naidu News: नवी मुंबई विमानतळाच्या उदघाटन सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस  आदी नेते काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा गाजवला तो नागरी हवाई वाहतून मंत्री राममोहन नायडू यांनी. तेलुगू भाषिक असलेल्या राममोहन नायडू यांनी उदघाटन सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना चक्क मराठीतून संबोधित केले.

नवी मुंबई परिसरात उभारण्यात आलेल्या  नवी मुंबई आंतरराष्ट्रीयविमानतळाच्या टर्मिनल-१ चे उद्घाटन  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज  झाले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्यासह अनेक नेते तिथे उपस्थित होते. या उदघाटन सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस  आदी नेते काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा गाजवला तो नागरी हवाई वाहतून मंत्री राममोहन नायडू यांनी. तेलुगू भाषिक असलेल्या राममोहन नायडू यांनी उदघाटन सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना चक्क मराठीतून संबोधित केले.

राममोहन नायडू म्हणाले की, मी आंध्र प्रदेशमधील आहे. इथे सर्वांनी मराठीतून भाषण केलं. त्यामुळे मीसुद्धा मराठीतून दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. जर माझ्याकडून काही चूक झाली तर मला माफ करा. भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक भारतीय आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी स्वप्ननगरी असलेल्या मुंबई शहरात येतात. तर अनेकजण इतर देशविदेशात जाण्यासाठी या शहरातून  गरुड भरारी घेतात. या सर्वांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या एक अमूल्य भेटीचं आज लोकार्पण करण्यात येत आहे. याचा मला खूप आनंद आहे, असे राममोहन नायडू यांनी सांगितले. 

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1339130920894339/}}}}दरम्यान, नवी मुंबई विमानतळावरून प्रत्यक्ष विमान वाहतूक नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होणार आहे. पुढील पाच ते सात वर्षांतच मुंबईचे सध्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ दुय्यम ठरेल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच महामुंबईचे मुख्य विमानतळ म्हणून जगाच्या नकाशावर ओळखले जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या देशात सर्वाधिक उड्डाणे होणारे विमानतळ म्हणून दिल्लीचा पहिला क्रमांक आहे. तर, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, नवी मुंबई विमानतळामुळे हे चित्र लवकरच बदलण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rammohan Naidu's Marathi Speech Steals Show at Navi Mumbai Airport Inauguration

Web Summary : Union Minister Rammohan Naidu surprised attendees at Navi Mumbai Airport's inauguration by delivering part of his speech in Marathi. He highlighted the airport's importance in fulfilling dreams of people coming to Mumbai. Experts predict it will become Mumbai's primary airport.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळmarathiमराठीCentral Governmentकेंद्र सरकार