शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून एलओसीवर सैन्य, शस्त्रांची जमावजमव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 08:30 IST

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघ करत आहे.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघ करत आहे. अशातच पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जादाचे लष्कराच्या तुकड्या आणि शस्त्रास्त्रे जमविण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा क्षेत्राशी संबंधीत सुत्रांनी वृत्तसंस्थेला ही माहीती दिली आहे. 

पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर 27 फेब्रुवारीला पाकच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसत हल्ल्याचा प्रयत्न केला. याला प्रत्यूत्तर देताना पाकचे एफ-16 आणि भारताचे मिग 21 बायसन ही विमाने पडली. यानंतर पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले असून भारतानेही जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. यामुळे तणावाखाली असलेल्या पाकिस्तानने सैन्याची जमावजमव सुरु केली आहे. 

अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानने लष्कराच्या तुकड्या आणि युद्धसामुग्री तैनात केली होती. भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानने तेथील तुकड्या आणि शस्त्रास्त्रे एलओसीवर हलविली आहेत. पाकिस्तानच्या या हालचालींवर भारताने आक्षेप नोंदविला असून एलओसीवरील रहिवाशी भागाला लक्ष्य केल्यास पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे. 

पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्रापासून नौशेरा सेक्टरमध्ये जोरदार गोळाबार केला होता. यावेळी त्यांनी भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. 155 एमएम आर्टिलरी गनमधून गोळाबार केला. यानंतर भारताच्या जवानांनीही त्यांना बोफोर्स तोफांद्वारे तोफगोळे डागून प्रत्त्यूत्तर दिले. यानंतर दोन्ही बाजुच्या लष्काराच्या अधिकाऱ्यांनी हॉटलाईनवर चर्चा केली. यावेळी भारताच्या रहिवाशी भागाला लक्ष्य न करण्याचे बजावण्यात आले आहे. 

भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्यांनुसार पाकिस्तानी लष्कराने बुधवारी कृष्णाघाटी आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये सैन्याच्या चौक्या आणि रहिवाशी भागात गोळीबार केला. यावेळी मोर्टारही डागण्यात आले. या गोळीबारात कोणतेही नुकसान झालेले नसले तरीही भारतानेही जोरदार प्रत्यूत्तर दिल्याचे म्हटले आहे. नौशेरा सेक्टरमध्ये दोन्ही बाजुंकडून गोळीबार तीन तास सुरू राहिला त्यात एक जवान जखमी झाला. कृष्णा घाटीत गोळीबार सकाळी सहा ते रात्री ८.१५ पर्यंत सुरू होता. सुंदरबनी सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजता गोळीबार सुरू होऊन बुधवारी पहाटे साडेचारला थांबला.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान