शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सैन्य, युद्धसाहित्याची झटपट व्यूहरचना करणे होणार शक्य, रेल्वेच्या सहकार्याने लष्कराची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 2:44 AM

देशाच्या पूर्व सीमेवरून पश्चिम सीमेपर्यंत सैन्य, युद्धसाहित्य आणि रसद यांची झटपट व कार्यक्षम वाहतूक करण्यासाठी भारतीय लष्कराने रेल्वेच्या मदतीने वेगवान पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या सीमा भागात लष्करी मदत जलदीने पोहोचविणे आणखी सुकर होईल.

नवी दिल्ली  - देशाच्या पूर्व सीमेवरून पश्चिम सीमेपर्यंत सैन्य, युद्धसाहित्य आणि रसद यांची झटपट व कार्यक्षम वाहतूक करण्यासाठी भारतीय लष्कराने रेल्वेच्या मदतीने वेगवान पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या सीमा भागात लष्करी मदत जलदीने पोहोचविणे आणखी सुकर होईल. २००१ साली आॅपरेशन पराक्रम दरम्यान लष्करी सामुग्रीच्या दळणवळणास विलंब लागला होता. त्यापासून लष्कराने धडा घेतला.रणगाडे, हॉवित्झर तोफा, लष्कराची अन्य चिलखती वाहने मालगाड्यांमध्ये लादण्यासाठी रेल्वेने अरुणाचल प्रदेशमधील भलुकपाँग, नागालँडमधील दिमापूर व सिलापथर, आसाममधील मिस्सामारी, मुर्कोंगसेलेक या ठिकाणी काँक्रिटचे रॅम्प बांधले आहेत. त्याचबरोबर, खास लष्करी मालगाड्यांचा वेग कसा वाढविता येईल, याच्याही चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे चीनलगतच्या सीमेवर जलदगतीने सैन्य व युद्धसामुग्रीची वाहतूक करणे सुलभ होईल. लष्करी तुकड्या व सामग्रीची ने-आण करण्यासाठी लष्कर दरवर्षी ७०० ते ८०० रेल्वेगाड्यांचा वापर करते. त्यापोटी लष्कर दरवर्षी दोन हजार कोटी रुपये रेल्वेला देते.लष्करी सामग्रीच्या दळणवळणासाठी काही ठिकाणी रेल्वे देखील स्वत: खर्च करते.लष्कराच्या मालकीच्या ५ हजार रेल्वे वॅगन असून, वाहतुकीदरम्यान त्या नेमक्या कुठल्या ठिकाणी आहेत, यावर इंटरनेटच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते. पूर्वी हे काम माणसांकरवी केले जायचे.आधी लागला होता एक महिनासन २००१ मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, भारताने ‘आॅपरेशन पराक्रम’ची तयारी हाती घेतली होती. त्या वेळी सीमेवर लष्करी फौजांची व सामग्रीची जमवाजमव करण्यास एक महिन्याचा कालावधी लागला होता. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर भारतीय सैन्याच्या संख्याबळात वाढ करण्यात आली होती. मात्र, या हालचाली काहीशा संथगतीने झाल्यामुळे पाकिस्तानला भारताविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायासमोर कांगावा करण्यास पुरेसा वेळ मिळाला. यापासून धडा घेऊन, तेव्हापासून लष्कराने रेल्वेच्या सहकार्याने काही पावले टाकायला सुरुवात केली. सीमेवर लष्करी सामग्री व जवानांना वेगाने पोहोचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर विचार सुरू झाला.खास रेल्वेमार्ग रखडलेपाकिस्तान व चीनच्या सीमेवर खास लष्करासाठी १४ रेल्वेमार्ग बांधण्याच्या कामास निधीच्या कमतरतेमुळे अद्याप सुरुवात होऊ शकलेली नाही. इशान्य भारतासाठी तीन व जम्मू-काश्मीरसाठी एक असे लष्करासाठी चार रेल्वेमार्ग बांधण्याचे काम तातडीने हाती घेतले जावे, अशी मागणी लष्कराने केली आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndian Railwayभारतीय रेल्वे