शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरातील मगरींचे स्थलांतर; सी-प्लेन सेवेसाठी खटाटोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:38 IST

पर्यटकांच्या सुरक्षेचे कारण केले पुढे

अहमदाबाद : जगातील सर्वांत उंच म्हणजेच १८२ मीटर उंचीच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरातील दोन तलावांमधील मगरींचे स्थलांतर करण्यात येत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप होत आहे.वन संरक्षक (वडोदरा वन्यजीव क्षेत्र) आराधना साहू यांनी सांगितले की, आतापर्यंत १२ मगरींचे स्थलांतर करण्यात आले आहे. दोन्ही तलावांत ३०० मगरी असून, ३० पिंजरे लावण्यात आले आहे. नेमक्या किती मगरी पकडून त्यांचे स्थलांतर करायचे आहे, याचा निश्चित आकडा ठरलेला नाही. आतापर्यंत पकडलेल्या मगरी सध्या वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येत असून, काही दिवसांनी त्यांना लवकरच सरदार सरोवातील मुख्य पाणीसाठ्यात सोडण्यात येणार आहे. सी-प्लेन सेवेसाठी हा घाट घातला जात आहे, या आरोपाचे आराधना साहू यांनी खंडन केले. त्या म्हणाल्या की, सर्वच्या सर्व मगरींचे स्थलांतर करण्याची अद्याप कोणतीही योजना नाही. आम्हाला त्याबाबत सूचना नाहीत. आम्ही केवळ पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे.मंत्र्यांनी केले होते सूतोवाचअहमदाबादेतील साबरमती रिव्हरफ्रंट येथून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सी-प्लेन सेवा सुरू करण्याचे सूतोवाच नागरी उड्डयनमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे मगरींचे स्थलांतर करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.गुजरातच्या नागरी उड्डयन खात्याचे प्रधान सचिव एस. जे. हैदर यांनी सांगितले की, याबाबत निश्चित काही ठरलेले नाही. परंतु ही सेवा पुतळ्याच्या परिसरातील दोन तलावांमध्ये सुरू होण्याची अधिक शक्यता आहे.

टॅग्स :Statue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटीGujaratगुजरात