शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘मिग’चे अखेरचे उड्डाण ठरले ‘अभिनंदनीय’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:21 IST

हवाईदलप्रमुख धनोआ आणि वैमानिक अभिनंदन यांनी केला सोबत प्रवास

पठाणकोट : हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी सोमवारी येथील हवाई तळावरून स्वत: सारथ्य करत ‘मिग’ जातीच्या लढाऊ विमानातून अखेरचे उड्डाण केले. यावेळी त्यांच्यासोबत यंदा ‘वीरचक्र’ देऊन गौरविलेले हवाईदलाचे बहाद्दर वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हेही होते.

अभिनंदन ‘मिग’ विमानांच्या ज्या २९ व्या स्वाड्रनमध्ये आहेत त्याचा पठाणकोट हा तळ आहे. बालाकोट हल्ल्याच्या वेळीही अभिनंदन येथूनच ‘मिग’ विमान घेऊन रवाना झाले होते. ही ‘मिग’ विमान आता खूपच जुनी झाली असून त्यांचा वापर या वर्षअखेर बंद केला जायचा आहे. उड्डाण करून परतल्यानंतर धनोआ व अभिनंदन या दोघांनीही आनंद व्यक्त केला. अभिनंदन व आपल्यात बऱ्याच बाबतीत साम्य असल्याचे सांगून हवाईदलप्रमुख म्हणाले की, आम्ही दोघांनीही पाकिस्तानशी युद्ध केले व आम्हाला दोघांनाही त्या हल्ल्याच्या वेळी विमानातून उडी मारून बाहेर पडावे लागले होते.हवाईदलप्रमुख स्वत:विषयी ज्या हल्ल्याचा उल्लेख केला तो १९९९ मधील कारगिल युद्धातील होता. त्यावेळी धनोआ ‘मिग’ विमानांच्या १७ व्या स्वाड्रनचे प्रमुख होते व त्यावेळी त्यांनी याच विमानांतून बॉम्बहल्ले करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानचे रसदीचे तळ उद््ध्वस्त केले होते. अपाचे हेलिकॉप्टर आज दाखल होणारच्अमेरिकेच्या बोर्इंग कंपनीकडून घेतलेल्या ‘अपाचे एएच ६४ई’ या जगातील सर्वोत्तम अशा आठ लढाऊ हेलिकॉप्टरची पहिली तुकडी मंगळवारी पठाणकोट हवाईतळावर भारतीय हवाईदलात दाखल होणार आहे. हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल धनोआ त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. अशी एकूण २२ ‘अपाचे’ हेलिकॉप्टर खरेदी केली जायची आहेत. ही सर्व हेलिकॉप्टर पुढील दोन वर्षांत मिळतील.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान