नवी दिल्ली- पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्याजवळ आज मिग -29 या लढाऊ विमानाला अपघात झाला. वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत सुरक्षितपणे बाहेर उडी घेतल्यानं पॅरेशूटच्या सहाय्यानं ते बचावले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वायुसेनेचे लढाऊ विमान मिग -29मध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे ते होशियारपूरजवळील रुड़की गावात कोसळले. विमानाच्या दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटमधून प्रवास केला. दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. मिग -29 ने या लढाऊ विमानानं सकाळी १० वाजता जालंधरमधील आदमपूर येथून उड्डाण घेतले. काही वेळानं तांत्रिक बिघाड झाला आणि विमानात आग लागली. विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापूर्वीच दोन्ही वैमानिकांनी पॅरेशूटच्या सहाय्यानं बाहेर उड्या घेतल्या, त्यामुळे त्यांचे प्राण बचावले आहेत. आता हवाई दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. तज्ज्ञांची टीम आल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण कळू शकणार आहे.
पंजाबमध्ये मिग-२९ विमान दुर्घटनाग्रस्त; दोन्ही वैमानिक सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 12:54 IST