शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातेत मध्यावधीचा काँग्रेसचा अंदाज; रुपाणी यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 06:26 IST

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे गुजरातेत भाजपाकडून मुदतीपूर्वच निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.

व्यंकटेश केसरी, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे गुजरातेत भाजपाकडून मुदतीपूर्वच निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असा अंदाज काँग्रेसकडून लावण्यात आला आहे. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या मते गुजरातेत पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. रूपानी हे भाजपाचे सर्वाधिक कमजोर मुख्यमंत्री आहेत. तथापि, हे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासाठी वरदानच ठरले. राज्याच्या कारभाराचा ताबा घेणे केंद्रीय नेतृत्वाला सोपे झाले, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. 

काही काँग्रेस नेत्यांच्या मते, कोविड साथ नीट न हाताळल्यामुळे रूपानी यांना हटविण्यात आले आहे. काहींना वाटते की, राज्यात आपचा प्रभाव वाढल्यामुळे त्यांना जावे लागले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते परेश धनानी यांनी सांगितले की, भाजपाचे केंद्रीय नेतृत्व राज्यावरील पकड गमावणारनाही.

पुढील वर्षी निवडणुका

विधानसभेच्या मुदतीनुसार, गुजरातेत पुढील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका व्हायला हव्यात. तथापि, पुढील वर्षी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेच निवडणुका लावल्या जाऊ शकतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणकीसोबत किंवा पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर विधानसभा निवडणुकांसोबत गुजरातच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असे काँग्रेसला वाटते. 

टॅग्स :GujaratगुजरातElectionनिवडणूकPoliticsराजकारण