शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांचं मोठं विधान; म्हणाले, भारतात जे घडतंय ते अतिशय दु:खद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 11:33 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भारतात विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भारतात विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनीसुद्धा या परिस्थितीला दु:खद असल्याचं म्हटलं आहे.जर एखादा बांगलादेशी निर्वासित भारतात इन्फोसिसचा सीईओ बनल्यास मला आनंद होईल. 

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भारतात विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे. त्यानंतर आता अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिस्थितीवर खंत व्यक्त केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनीसुद्धा या परिस्थितीला दु:खद असल्याचं म्हटलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात बजफीडचे संपादक बेन स्मिथ यांनी सत्या नाडेला यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी या सर्व परिस्थितीवर भाष्य केलं. मला वाटतं जे होतंय ते अतिशय दुःखद आहे.मायक्रोसॉफ्टचे सीईओ नाडेला यांनी मॅनहटन इथल्या एका कार्यक्रमात हे विधान केलं. विशेष म्हणजे नागरिकत्व कायद्यावरून देशभरात विरोधी पक्षांचं विरोध प्रदर्शन सुरू असतानाच नाडेला यांनी हे वक्तव्य केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. जर एखादा बांगलादेशी निर्वासित भारतात इन्फोसिसचा सीईओ बनल्यास मला आनंद होईल. सत्या नाडेला यांच्यामार्फत मायक्रोसॉफ्ट इंडियाद्वारे खुलासा करण्यात आला आहे. प्रत्येक देशाला आपल्या सीमा परिभाषित करणं, राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करणं आणि कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत हे सर्व जनता आणि सरकारकडून विचार विनिमयातून ठरवलं जातं. मी भारतीय मूल्यांच्या आधारावरच मोठा झालो आहे. भारतातल्या विविधतेतल्या संस्कृतीतही एकता आहे. अमेरिकेतला माझा प्रवासी अनुभवही चांगला राहिला आहे. भारतात येऊन एखाद्या प्रवासी निर्वासितानं चांगला स्टार्ट अप व्यवसाय, मोठी कंपनी सांभाळण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. जेणेकरून त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल.10 जानेवारीला देशभरात लागू झाला CAAदेशभरात झालेल्या विरोध प्रदर्शनानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा शुक्रवारी 10 जानेवारीला लागू करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयानं एक अधिसूचना जारी करत हा कायदा लागू केल्याचं सांगितलं. त्यामुळे आता पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या गैर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. या कायद्याला संसदेनं मंजुरी दिल्यानंतर अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यात आलं होतं. तर भाजपानंही या कायद्यासंदर्भात माहिती देणारं एक अभियान राबवलं आहे.  या विरोध प्रदर्शनात बॉलिवूडचे काही कलाकारही सहभागी झाले आहेत. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आणि जामिया मिलिया सारख्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी महिन्याभराहून अधिक काळ या कायद्याविरोधात प्रदर्शन करत आहेत. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक